कोविड निर्बंधाचे ढग हटले! आंतरराष्ट्रीय विमान सेवा अखेर 27 मार्चपासून पूर्ण क्षमतेनं

केंद्र सरकारच्या कोविड सुधारित नियमांचा आढावा घेऊन वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. मात्र, सर्व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक केंद्रीय हवाई मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय यांच्या संयुक्त देखरेखीखाली सुरू असणार आहे.

कोविड निर्बंधाचे ढग हटले! आंतरराष्ट्रीय विमान सेवा अखेर 27 मार्चपासून पूर्ण क्षमतेनं
अखेर पूर्ण क्षमतेनं विमान वाहतूक सुरु होणार!
Image Credit source: TV9 Marathi
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Mar 08, 2022 | 9:41 PM

नवी दिल्ली : वाढते लसीकरण आणि कोविड विषाणूंच्या घटत्या प्रादूर्भावामुळं सार्वजनिक वावरावरील निर्बंध पुन्हा शिथिल केले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून मर्यादित आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा पूर्ण क्षमतेनं सुरू होणार आहे. केंद्रीय हवाई मंत्रालयानं (Civil Aviation Ministry) आज (मंगळवार) आंतरराष्ट्रीय उड्डाणांबाबत महत्वाची घोषणा केली.येत्या 27 मार्च पासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा पूर्ण क्षमतेन सुरू होणार असल्याचं हवाई मंत्रालयानं म्हटलं आहे. यामध्ये प्रवाशी वाहतुकीसोबत वाणिज्य वाहतुकीचा देखील समावेश असणार आहे. कोविड निर्बंधामुळे (COVID REGULATION) आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर हवाई मंत्रालयानं मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले होते. केंद्र सरकारच्या कोविड सुधारित नियमांचा आढावा घेऊन वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. मात्र, सर्व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक केंद्रीय हवाई मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय (HEALTH MINSTERY) यांच्या संयुक्त देखरेखीखाली सुरू असणार आहे.

..झालं मोकळं आकाश!

हवाई वाहतूक संचालनालयाचे संचालकांनी आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर निर्बंधाचं पत्रक यापूर्वी जारी केलं होतं. तथापि, हवाई वाहतूक संचलनालयाच्या माहितीनुसार सर्व आंतरराष्ट्रीय वाहतूक एअर बबल व्यवस्थेअंतर्गत कार्यान्वित असतील तसेच आंतरराष्ट्रीय कार्गो विमानांची वाहतूक विहित वेळापत्रकानुसार सुरू राहील.

भारतात आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा मार्च 23, 2020 पासून स्थगित करण्यात आली होती. तथापि. विशेष आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक भारत आणि 35 देशांमध्ये एअर बबल व्यवस्थेच्या अंतर्गत सुरू होत्या. सध्या भारतानं कॅनडा, फ्रान्स,जर्मनी, यूएई, इंग्लंड आणि अमेरिका यांच्यासहित 40 देशांसोबत एअर बबल व्यवस्थेअंतर्गत विमान वाहतुकीचा करार केला आहे.

एअर बबल म्हणजे काय?

एअर बबल ही विमान वाहतूक संबंधित द्विपक्षीय करार रचना आहे. यामध्ये करार अंतर्गत दोन्ही देशांच्या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांचे नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असते. विशेष नियमावली अंतर्गत या कराराच्या माध्यमातून दोन्ही देशातील वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नियमित हवाई वाहतूक सुरु होत नाही तोपर्यंत या कराराअंतर्गतच विमान सेवा होणे अपेक्षित आहे.

संबंधित बातम्या :

शेअर बाजारात शुगर स्टॉक्सचा गोडवा, 20 टक्क्यांची तेजी! गुंतवणूकदारांच्या खरेदीसाठी उड्या

आता इंटरनेटशिवायही वापरता येणार UPI सेवा! RBI कडून फीचर फोनसाठी यूपीआय सेवा सुरु

महिला सक्षमीकरणावर ‘मुद्रा’ची मोहर ! सहज कर्ज मिळवा आणि उद्योजिका व्हा


Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें