
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे, पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला होता, या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी ठार झाले होते. आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे भारताच्या एका इशाऱ्यावर पाकिस्तानवर एका रात्रीत आपलं अख्ख गाव खाली करण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानने आपल्या तब्बल दीड लाख लोकांचं स्थलांतर केलं आहे.
नेमकं कारण काय?
भारत आणि पाकिस्तानमधील संर्घष सध्या टोकाला पोहोचला आहे, अशा परिस्थितीमध्ये आता भारतानं सोडलेल्या पाण्यामुळे पाकिस्तानमध्ये पूर स्थिती निर्माण झाल्यास हा तणाव आणखी वाढण्याची स्थिती आहे. याबाबत बोलताना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, सोमवारी त्यांना भारताकडून अचानक माहिती मिळाली की, भारताच्या पंजाब राज्यात स्थित असलेल्या माधोपूर धरणातून पाणी सोडलं जाणार आहे.
भारतानं माधोपूर धरणातून पाणी सोडल्यास आता पाकिस्तानमध्ये पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पाकिस्तानने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत तब्बल दीड लाख लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. पाकिस्तानने एक गाव तर अख्ख रिकामं केलं आहे. भारतानं माधवपूर धरणातून पाणी सोडल्यास पाकिस्तानच्या पजांब प्रांतातील काही भागांमध्ये पूर येण्याची शक्यता आहे, त्यामुळे पाकिस्ताने या भागातील अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे.
एवढंच नाही तर पाकिस्तानमधील पंजाब प्रांत हा पाकिस्तानच्या धान्याचं कोठार म्हणून ओळखलं जातं, येथील जमीन खूप सुपीक आहे. पाकिस्तानच्या अन्न धान्याची मोठी गरज याच प्रांतामधून पूर्ण होते. अशा स्थितीत भारतानं धरणाचं अतिरिक्त पाणी सोडल्यास याचा मोठा फटका हा पाकिस्तानला बसण्याची शक्यता आहे. शेतीचं प्रचंड नुकसान होऊ शकतं. याचा मोठा फटका हा पाकिस्तानला बसण्याची शक्यात आहे.
दरम्यान माधोपूर धरणातून पाणी सोडण्याची योजना असल्याचं भारताकडून पाकिस्तानला सांगण्यात आलं आहे, त्यामुळे आता तेथील प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाल्याचं पहायला मिळत आहे.