AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Pakistan War Situation : मोठी बातमी, राजधानी दिल्लीवर हल्ल्याचा प्रयत्न, किती किलोमीटर अंतरावर PAK क्षेपणास्त्र पाडलं?

India Pakistan War Situation : मोठी बातमी आहे. पाकिस्तानने दिल्लीवर हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानने त्यांचं घातक क्षेपणास्त्र दिल्लीच्या दिशेने सोडलं होतं. पण सर्तक असलेल्या सशस्त्र पथकांनी वेळीच त्यांचा हा हल्ला हाणून पाडला. जाणून घ्या त्या बद्दल अधिक माहिती.

India Pakistan War Situation : मोठी बातमी, राजधानी दिल्लीवर हल्ल्याचा प्रयत्न, किती किलोमीटर अंतरावर PAK क्षेपणास्त्र पाडलं?
Pakistan Weapon
| Updated on: May 10, 2025 | 1:23 PM
Share

भारत-पाकिस्तानमध्ये मागच्या चार दिवसांपासून तणाव कायम आहे. पाकिस्तान सतत भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी पाकिस्तानकडून ड्रोन आणि मिसाइलचा वापर सुरु आहे. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी पाकिस्तानने भारतावर अनेक ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न केला. भारताने त्यांचे सर्व हल्ले परतवून लावले. सोबतच पाकिस्तानच्या नापाक हरकतीला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. शनिवारी रात्री पाकिस्तानने दिल्लीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय सैन्याने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. पाकिस्तानने दिल्लीच्या दिशेने मिसाइल सोडली होती. पण सशस्त्रबलाची सर्तकता आणि तत्परतेने त्यांचा हल्ल्याचा प्रयत्न अयशस्वी केला. भारताने पाकिस्तानच फतेह-1 मिसाइल पाडलं आहे.

भारताने पाकिस्तानचा हा प्रयत्न दिल्लीपासून 300 किलोमीटर अंतरावरच हाणून पाडला. दिल्लीच्या दिशेने ही मिसाइल जात असल्याचा अंदाज आहे. सिरसामध्येच पाकिस्तानच क्षेपणास्त्र इंटरसेप्ट करण्यात आलं. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानच एक फायटर जेटही पाडण्यात आलं.

आप शंभू मंदिराला टार्गेट करण्याचा प्रयत्न

पठानकोट क्षेत्रात आज सकाळी ड्रोन एक्टिविटी दिसली. एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. हिमाचलच्या माजरा येथे एक UAV (मानवरहीत विमान) पाडण्यात आलं. पाकिस्तानने जम्मूमधील हिंदुंच श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध आप शंभू मंदिराला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. हे मिसाइल मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पडलं. या पवित्र स्थानाच काहीही नुकसान झालं नाही. पाकिस्तानने पंजाबच्या अमृतसरमध्ये केलेला हल्ल्याचा प्रयत्न अयशस्वी ठरली.

भारताच्या राजधानीला टार्गेट करण्याचा प्रयत्न

पाकिस्तान भारताची राजधानी दिल्लीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून त्यांचे बरेच प्रयत्न सुरु आहेत. पण जिथे-जिथे पाकिस्तानचे हल्ले होत आहेत, तिथे-तिथे एअर डिफेन्स सिस्टिम हवेतच पाकिस्तानी मिसाइल्सना नष्ट करत आहे.

भारतात 26 ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न

ऑपरेशन सिंदूर नंतर भारताला प्रत्युत्तर कसं द्यायचं हेच पाकिस्तानला कळत नाहीय. म्हणून पाकिस्तानकडून अशा प्रकारचे हल्ले सुरु आहेत. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी पाकिस्तानने भारतात 26 ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न केला. ड्रोन आणि मिसाइलद्वारे हल्ले केले. भारताने प्रत्येक हल्ल्याचा सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...