पाकची बोबडी वळली, भारतीय सैन्याची आता पुन्हा मॉक ड्रील, काय आहे ‘ऑपरेशन शील्ड’?

ही ड्रिल आधी २९ मे रोजी होणार होती परंतु प्रशासकीय कारणांमुळे ती पुढे ढकलण्यात आली. यापूर्वी ७ मे रोजी, ऑपरेशन सिंदूरच्या काही तास आधी देशभरात मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली होती.

पाकची बोबडी वळली, भारतीय सैन्याची आता पुन्हा मॉक ड्रील, काय आहे ऑपरेशन शील्ड?
| Updated on: May 31, 2025 | 9:13 PM

भारत पाक तणाव कायम असतानाच आता ३१ मे रोजी पुन्हा सीमेकडींल राज्यांत मॉक ड्रील होणार आहे. ही ड्रील ऑपरेशन शील्ड नावाने ओळखली जात आहे. ही मॉक ड्रील 29 मे रोजीच होणार होती. परंतू अचानक ती पुढे ढकलली होती. याआधी 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काही तास आधी देशभरात मॉक ड्रील घेण्याचा आदेश जारी झाला होता. पुढचा इतिहास जगाला माहिती आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या पाया खालची जमीन सरकली आहे.

जम्मू-कश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि केंद्र शासित प्रदेश चंडीगड येथे ही मॉक ड्रील केली जाणार आहे. आधी ही मॉक ड्रील २९ मे रोजी होणार होती. परंतू काही अपरिहार्य कारणांनी ही मॉक ड्रील रद्द करण्यात आली होती. या तीन राज्यात अलिकडेच भारत आणि पाकिस्तानात तीन रात्री जबरदस्त चमकम उडाल्यानंतर आता मॉक ड्रील करण्यात येत आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताच्या नागरी वस्त्या आणि धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यात आले होते.

३१ तारखेला सीमावर्ती राज्यांत मॉक ड्रिल

यापूर्वी, ७ मे रोजी, ऑपरेशन सिंदूरच्या काही तास आधी, देशभरात एक मॉक ड्रिल घेण्यात आली होती. त्याच रात्री, भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर एक मोठी कारवाई केली.ऑपरेशन शील्ड अंतर्गत मॉक ड्रिलचा उद्देश सीमावर्ती राज्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी तपासणे आहे. त्यात एनडीआरएफ, नागरी संरक्षण, स्थानिक पोलिस, आरोग्य विभाग आणि इतर आपत्कालीन संस्थांचा समावेश असेल.

अनेक एजन्सी सहभागी असतील

प्रशासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की यावेळी मॉक ड्रिल अधिक पद्धतशीर आणि व्यावहारिक पद्धतीने राबवले जाईल जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत लोकांची सुरक्षा सुनिश्चित करता येईल. तुम्हाला सांगतो की, ऑपरेशन शील्ड अंतर्गत दुसरा नागरी संरक्षण सराव ३१ मे रोजी पाच राज्यांमध्ये आयोजित केला जाईल. ७ मे रोजी देशातील विविध संवेदनशील भागात, विशेषतः पश्चिम सीमेवर झालेल्या पहिल्या नागरी संरक्षण सरावात आढळलेल्या कमतरता दूर करण्यासाठी हा सराव आयोजित केला जात आहे. या दुसऱ्या सरावाचे उद्दिष्ट शत्रूच्या हल्ल्याच्या बाबतीत नागरी संरक्षण तयारी अधिक मजबूत करणे आहे.

 ऑपरेशन सिंदूरच्या आठवणी ताज्या

या आधी 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूरच्या काही तास आधी देशभरात मॉक ड्रील करण्याचे आदेश जारी झाले होती. आणि त्याच रात्री भारतीय सैन्याने पाक व्याप्त काश्मीरातील दहशतवाद्यांच्या नऊ अतिरेकी कँपना लक्ष्य करणारे ऑपरेशन घडवले होते.आता पुन्हा 31 मे रोजी मॉकड्रील होत आहे,या मॉकड्रीलचे स्वरुप केवळ सीमेवरील राज्यातील नागरिकांना आपात्कालीन स्थिती काय खबरदारी घ्यायची याचे धडे देणे हेच आहे.यात एनडीआरएफ, सिव्हील डिफेंन्स, स्थानिक पोलीस, स्वास्थ्य विभाग आणि अन्य आपात्कालीन एजन्सींचा सहभाग असणार आहे.

मॉक ड्रील अनेक यंत्रणांचा सहभाग

ही मॉक ड्रील अधिक नियोजनबद्ध आणि व्यावसायिक रितीने राबविण्यात येईल, या राज्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत लोकांना स्वत:चे संरक्षण कसे करायचे आणि सुरक्षा यंत्रणांनी या घडीला कसा जलद प्रतिसाद द्यायचा याचे हे सुनियोजित प्रशिक्षण असणार असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पहिल्या त्रूटी दूर करणारे मॉक ड्रील

या मॉक ड्रीलचे नाव “ऑपरेशन शील्ड” असे ठेवले आहे. या मोहीमेंतर्गत दुसरा नागरी संरक्षण सराव 31 मेला पाच राज्यांमध्ये होणार आहे. 7 मे रोजी देशाच्या विविध संवेदनशील भागात, विशेषतः पश्चिम सीमेवर झालेल्या पहिल्या मॉक ड्रीलमध्ये आढळलेल्या त्रूटी दूर करण्याचा प्रयत्न या मॉक ड्रीलमध्ये असणार आहे.शत्रूच्या हल्ल्याच्या वेळी नागरी संरक्षणाची तयारी अधिक मजबूत करणे हा या दुसऱ्या मॉक ड्रीलचा उद्देश्य मानला जात आहे.ऑपरेशन शील्ड अंतर्गत नागरी संरक्षण सरावाचे ३१ मे रोजी जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि चंदीगड येथे आयोजन केले आहे.