AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राकेश शर्मा यांच्यानंतर 41 वर्षानी पुन्हा अवकाशात झेपावण्याच्या एका भारतीयाच्या स्वप्नाला ब्रेक, मिशन Axiom-4 स्थगित

Axiom 4 mission launch postponed : 41 वर्षापूर्वी राकेश शर्मा यांनी 1984 साली तेव्हाच्या सोवियत युनियन म्हणजे आताच्या रशियाच्या सोयूज यानाने अवकाश प्रवास केला होता. त्यांच्यानंतर शुभांशु शुक्ला यांच्या रुपाने 41 वर्षानंतर पुन्हा एकदा एक भारतीय अवकाशात जाणार आहे.

राकेश शर्मा यांच्यानंतर 41 वर्षानी पुन्हा अवकाशात झेपावण्याच्या एका भारतीयाच्या स्वप्नाला ब्रेक, मिशन Axiom-4 स्थगित
shubhanshu shukla axiom 4 mission
| Updated on: Jun 11, 2025 | 7:53 AM
Share

भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या अवकाशात जाण्याच्या स्वप्नाला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. शुभांशु आणि अन्य 3 अंतराळवीर Axiom-4 मिशनद्वारे आज आंतरराष्ट्रीय अवकाश तळाच्या (ISS) दिशेने उड्डाण करणार होते. पण Axiom-4 मिशनला सध्या स्थगित करण्यात आलं आहे. स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटमध्ये गळती होत आहे. ती दुरुस्त करण्यासाठी इंजिनिअर्सनी अजून वेळ मागितला आहे. त्यामुळे हे मिशन तूर्तास स्थगित करण्यात आलं आहे.

पोस्ट स्टेटिक बूस्टर तपासणी दरम्यान लिक्विड ऑक्सीजनमध्ये गळती सुरु असल्याच लक्षात आलं. त्यामुळे स्पेसएक्सने एक्सिओम-4 मिशनसाठी फाल्कन-9 रॉकेटच लॉन्चिंग टाळण्याचा निर्णय घेतला. “स्टेटिक फायर बूस्टर निरीक्षणादरम्यान एलओएक्समध्ये गळती सुरु असल्याच लक्षात आलं. त्याच्या दुरुस्तीसाठी स्पेसएक्स टीम्सना अतिरिक्त वेळ देण्यासाठी Ax-4 च फाल्कन 9 रॉकेटच लॉन्चिंग होणार नाही” असं स्पेसएक्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटलं आहे.

41 वर्षानंतर पुन्हा एक भारतीय अवकाशात जाणार

“हे काम पूर्ण झाल्यानंतर रेंजची उपलब्धता लक्षात घेऊन लॉन्चिंगच्या नव्या तारखेची घोषणा करु” असं स्पेसएक्सने म्हटलं आहे. शुभांशु शुक्ला यांच्या रुपाने 41 वर्षानंतर पुन्हा एकदा एक भारतीय अवकाशात जाणार आहे. त्यासाठी अजून प्रतिक्षा करावी लागेल. याआधी राकेश शर्मा यांनी सोवियत युनियनच्या इंटरकॉस्मोस कार्यक्रमाच्या माध्यमातून 8 दिवस पृथ्वी प्रदक्षिणा केली होती.

किती दिवसांच मिशन?

लखनऊनमध्ये जन्मलेले शुभांशु शुक्ला भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) आणि नासा समर्थित एक्सिओम स्पेस मिशनचा भाग आहेत. आधी ठरलेल्या कार्यक्रमानुसार आज बुधवारी संध्याकाळी फ्लोरिडाच्या केनडी अवकाश तळावरुन इंटरनॅशनल स्पेस सेंटरसाठी चार अंतराळवीर रवाना होणार होते. 14 दिवसांच हे मिशन आहे.

कोण आहेत शुभांशु शुक्ला?

10 ऑक्टोंबर 1985 रोजी जन्मलेल्या शुभांशु यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मधून पदवी घेतली आहे. सिटी मॉन्टेसरी शाळेत त्यांचं शिक्षण झालं आहे. 2006 साली इंडियन एअर फोर्समध्ये दाखल झाले. त्यांच्याकडे सुखोई-30 एमकेआय, मिग-29, जगुआर आणि डोर्नियर-228 सह अनेक विमानांमधून 2 हजार तासापेक्षा अधिक विमान उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी भारतीय विज्ञान संस्थान (IIS), बंगळुरुमधून एअरोस्पेस इंजीनियरिंग विषयात एमटेकची डिग्री सुद्धा मिळवली आहे.

भारताच मिशन गगनयान कधी?

इंडियन एअरफोर्समध्ये ग्रुप कॅप्टन असलेल्या शुभांशु शुक्ला यांना 2019 साली अन्य अधिकारी अंगद प्रताप, प्रशांत बालकृष्णन नायर आणि अजित कृष्णन यांच्यासह गगनयान मिशनसाठी निवडण्यात आलं होतं. मिशन गगनयान 2027 मध्ये पार पडेल. त्यांच्याआधी 41 वर्षापूर्वी राकेश शर्मा यांनी 1984 साली तेव्हाच्या सोवियत युनियन म्हणजे आताच्या रशियाच्या सोयूज यानाने अवकाश प्रवास केला होता.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.