मोठी बातमी ! भारतात येणाऱ्यांना दिलासा, केंद्राने व्हिसावरील बंदी हटवली

केंद्रीय गृहमंत्रालयाने काढलेल्या आदेशानुसार ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (OCI) आणि पर्सन ऑफ इंडियन ओरिजीन (POI) व्हिसाधारक तसेच विदेशी नागरिकांना भारतात येण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मोठी बातमी ! भारतात येणाऱ्यांना दिलासा, केंद्राने व्हिसावरील बंदी हटवली
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 7:24 PM

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिसावर घातलेली बंदी आता केंद्र सरकारने उठवली आहे. नव्या आदेशानुसार ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया, (OCI) पर्सन ऑफ इंडियन ओरिजीन (POI) व्हिसाधारक तसेच परदेशी नागरिकांना भारतात येण्यास परवानगी देण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक, पर्यटन आणि वैद्यकीय व्हिसा असणाऱ्यांना देशात येण्यास अजूनही बंदीच राहील. त्यांच्यासाठी कोणतेही नियम शिथील केलेले नाहीत.

वैद्यकीय व्हिसासाठी अर्ज करण्यास मुभा

नव्या आदेशानुसार OPI, POI  आणि  परदेशी नागरिक व्यापार, सम्मेलन, रोजगार, शिक्षण या कारणांसाठी भारतात येऊ शकतात. वैद्यकीय उपाचासाठी भारतात यायचे असेल तर त्यासाठी वैद्यकीय व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. रुग्णासोबत आणखी एकाला भारतात येता येईल.

कोरोनाविषयक नियमांचे पालन करणे गरजेचे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात येण्यासाठी सरकारने काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. परदेशी नागरिकांना भारतात आल्यानंतर या गाईडलाईन्सचे पालन करावे लागेल. सर्वात आधी त्यांना क्वारन्टाईन व्हावे लागेल. क्वारन्टाईनचा काळ पूर्ण केल्यानंतरच त्यांना बाहेर फिरण्यास मुभा असेल.

दरम्यान कोरोना संसर्ग पाहता 23 मार्चपासून देशात आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर जवळपास दोन महिन्यानंतर म्हणजेच  25 मेला काही प्रादेशिक विमान उड्डाणांना केंद्र सरकारने परवानगी दिली होती. विदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी मिशन वंदे भारतही केंद्र सरकारने राबवलं होतं.

संबंधित बातम्या :

Vacation Trip | भारताशेजारील ‘या’ देशांमध्ये फिरण्यासाठी व्हिसाची गरज नाही!

Corona | 15 एप्रिलपर्यंत परदेशी नागरिकांना भारत बंदी, सर्व व्हिसा रद्द, भारताचा मोठा निर्णय

आता आधार कार्डवर परदेशात जा, व्हिसाची गरज नाही!

Non Stop LIVE Update
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.