नव्या व्हायरसने खळबळ, केंद्र सरकारकडून तडकाफडकी गाईडलाईन्स जारी; नागरिकांना महत्त्वाच्या सूचना!

सध्या जगाने इबोला या विषाणूचा धसका घेतला आहे. कांगो, युगांडा, दक्षिण सुडान या भागात इबोला या विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे भारताने मोठा निर्णय घेतला आहे.

नव्या व्हायरसने खळबळ, केंद्र सरकारकडून तडकाफडकी गाईडलाईन्स जारी; नागरिकांना महत्त्वाच्या सूचना!
ebola virus outbreak
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 24, 2026 | 3:20 PM

Ebola Virus : सध्या जगात एका जुन्या परंतु जीवघेण्या विषाणूची दहशत निर्माण झाल आहे. इबोला असे या व्हायरसचे नाव आहे. या व्हायरसची एकदा लागण झाली की त्यापासून स्वत:ला वाचवणे खूप कठीण होते. विशेष म्हणजे या विषाणूपासून माणसाला वाचवण्यासाठी निश्चित अशी एक उपचार पद्धती नसल्याने मोठी अडचण निर्माण होते. आता पुन्हा एकदा या विषाणून डोकं वर काढलं आहे. हीच बाब लक्षात घेता आता जागतिक आरोग्य संघटनेने सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने घेतलेल्या या निर्णयानंतर भारतानेदेखील मोठे पाऊल उचलले आहे. भारताने आपल्या नागरिकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने जारी केली आरोग्य आणीबाणी

मिळालेल्या माहितीनुसार कांगो, युंगांडा आणइ दक्षिण सुडान या देशांमध्ये इबोलाची लागण झालेले काही रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णावर सध्या उपचार केले जात आहे. इबोला व्हायरसची लागण झाल्याने काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, हीच बाब लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय आरोग्य अधिनियम 2005 अंतर्गत 17 मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्यविषयक आणीबाणी जाहीर केली आहे. त्यानंतर आता भारतानेही आपल्या नागरिकांना कांगो, युगांडा आणि दक्षि सुडानमध्ये प्रवास करणे टाळा, असे आवाहन केले आहे. गरज नसेल तर विनाकारण या देशांमध्ये प्रवास करू नका, असेही केंद्र सरकराने म्हटले आहे.

भारतात काय खबरदारी घेतली जात आहे?

भारताच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक प्रसिद्ध पत्रक जारी केले आहे. या पत्रकानुसार कांगो, युगांडा आणि दक्षिण सुडान या देशांत प्रवास करणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे. ज्या भागात इबोलाच्या बुंडिबुग्यो या उपप्रकाराचा प्रसार ज्या देशांत झालेला आहे, तेथून एखादा प्रवासी आल्यास त्या प्रवाशाचा शोध घेणे, त्याची तपासणी करणे, या प्रवाशाबाबत रिपोर्ट करणे तसेच प्रतिबंध म्हणून काही खबरदारी घेणे या कृती करण्यात येतील असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, भारतात सध्यातरी या इबोला व्हायरसच्या नव्या उपप्रकाराची लागण झालेला एकही रुग्ण आढललेला नाही. तरीदेखील भारतात खरदारी घेतली जात आहे.

Follow Us