भारतावर हंता व्हायरसचं संकट धडकलं? तातडीने 165 लॅब्समध्ये केलं जणार…त्या दोन भारतीयांचं काय झालं?

एका क्रूझ शिपवर हंता व्हायरसचा उद्रेक झाला आहे. त्यानंतर आता जगभरात अलर्ट देण्यात आला आहे. या अलर्टनंतर भारतही अलर्ट मोडवर गेला आहे. या व्हायरसचा सामना करण्यासाठी भारताने आता सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.

भारतावर हंता व्हायरसचं संकट धडकलं? तातडीने 165 लॅब्समध्ये केलं जणार...त्या दोन भारतीयांचं काय झालं?
hantavirus
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 11, 2026 | 4:02 PM

Hanta Virus : एमव्ही होडियन्स क्रुझ या जहाजावर हंता व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरला. या विषाणूची लागण झाल्याने त्या जाहाजातून प्रवास करणाऱ्या अनेकांचा मृत्यू झाला. तर काही लोकांना त्याची लागण झालेली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या जहजावर हंता व्हायरस पसरल्यामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. जहाजामधील क्रू मेंबर्समध्ये दोन भारतीयांचाही समावेश आहे, त्यामुळेच भारताचीही चिंता वाढली आहे. आगामी काळातील संभाव्य धोका लक्षात घेता भारताने मोठा निर्णय घेतला आहे.

क्रूझ जहाजामध्ये हंता व्हायरसचा उद्रेक

मिळालेल्या माहितीनुसार भारतात हंता विषाणूने ग्रासलेला एकही नागरिक आढळलेला नाही. परंतु जागतिक पातळीवरील स्थिती लक्षात घेता भारताने हाय लेव्हल बायोसर्व्हिलान्स प्रणाली सक्रीय केली आहे. हंता विषाणून देशभरात पसरू नये यासाठी भारताने हे पाऊल उचलले आहे. एमव्ही क्रूझवर दोन भारतीय असल्याने हा व्हायरस भारतात दाखल होऊ नये, यासाठी भारताने हा निर्णय घेतला आहे. क्रुझमधील दोन्ही भारतीयांना सध्या आरोग्यविषयक सुरक्षा नियमांनुसार नेदरलँड्सला पाठवण्यात आले आहे. त्यांना क्वारन्टाईन ठेवण्यात आले आहे. हंता व्हायरसची लागण झाल्याचे कोणतेही लक्षण अद्याप त्यांच्यात दिसून आलेले नाही. परंतु पुढचे 45 दिवस त्यांच्यावर नजर ठेवली जाणार आहे.

उंदरामुळे होते हंता व्हायरसची लागण

उँदरांच्या मल-मूत्राच्या संपर्कात आल्यानंतर हंता व्हायरसची लागण होते. एका माणसापासून दुसऱ्या माणसाला या व्हायरसची लागण होत नाही. परंतु या व्हायरसच्या अनेक प्रजाती आहे. यातीलच Andes strain हा स्ट्रेन खूप धोकादायक आहे. Andes strain या स्ट्रेनमुळे हंता व्हायरसची लागण एका माणसापासून दुसऱ्या माणसाला लागू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. भारतातील आयसीएमआर संघटनाही अलर्ट मोडवर आहे.

भारताने नेमका काय निर्णय घेतला आहे?

भारतातील आयसीएमआरने हंता व्हायरसवर संशोधन करण्यास सुरुवात केली आहे. तसेच डायग्नॉस्टिक लॅब्सही चालू केल्या आहेत. पूर्ण देशात आयसीएमआरच्या एकूण 165 प्रयोगशाळा आहेत. या सर्व प्रयोगशाळा आता हंता व्हायरसवर अभ्यास करण्यासाठी सक्रिय करण्यात आल्या आहेत. या लॅबमध्ये हंता व्हायरसची लागण झाल्याचा संशय असणाऱ्या रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us