पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार मोठा निर्णय? परदेशातून भारतात येताच तात्काळ बोलावली मंत्र्यांची बैठक, दिल्लीत..
इराण आणि अमेरिका युद्धात अनेक देशांचे वाटोळे झाले. भारतात सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. आतापर्यंत दोनदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. आजा मोठी बैठक बोलावण्यात आली.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दाैऱ्यानंतर भारतात परतले आहेत. भारतात येताच त्यांनी तात्काळ एक महत्वाची बैठक बोलावली. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशाचे लक्ष आजच्या पंतप्रधान मोदींच्या बैठकीकडे लागले आहे. विदेश दाैऱ्यात महत्वाचे करार नरेंद्र मोदी यांच्या दाैऱ्यात झाली. इराण आणि अमेरिका युद्धात भारतीय अर्थव्यवस्था एका वाईट स्थितीतून जात आहे. त्यामध्येच केंद्र सरकारकडून मोठे निर्णय घेतली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील मंत्रिमंडळाची बैठक आज गुरुवारी होणार आहे. विदेश दाैऱ्याहून भारतात येताच त्यांनी या बैठकीचा निर्णय घेतला. इराण आणि अमेरिका युद्धात पेट्रोल आणि डिझेलची मोठी समस्या आहे. मागील काही दिवसात दोनदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली. यासोबतच सोने न खरेदी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला सर्व कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आणि इतर राज्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत काही मोठे निर्णय आणि मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. या वर्षातील ही मंत्रिमंडळाची पहिली बैठक असेल. मध्य पूर्वेतील संकटातून मार्ग काढण्याकरिता ही बैठक बोलावल्याचा अंदाज आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. एलपीजीच्या दरांबाबतही चर्चा सुरू असून, त्यात कोणत्याही क्षणी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासोबतच देशात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवडा आहे. लोकांना 12-12 तास पेट्रोल आणि डिझेलकरिता लाईनमध्ये थांबावे लागत आहे. स्थिती गंभीर होत चालली आहे.
राज्यात 1 महिन्यांचा पेट्रोल आणि डिझेला साठा असल्याचे मंत्री छगण भुजबळ यांनी कालच स्पष्ट केले. जर इराण आणि अमेरिका युद्ध पुढे काही काळ असेच सुरू राहिले तर त्याचे वाईट परिणाम सहन करावे लागतील. गेल्या 12 आठवड्यांपेक्षाही अधिक काळापासून इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. युद्धविरामचा प्रस्ताव अमेरिकेला इराणकडून देण्यात आला. मात्र, अजून युद्धविरामाची कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.