AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Train मध्ये TTE तुमचा फोन चेक करू शकतो? रेल्वेचा नियम माहिती आहे का?

Can TTE Check Your Phone in Train: भारतीय रेल्वेत प्रवास करताना काही नियम पालन करणे गरजेचे आहे. रेल्वेत तिकीट तपासणीस तुमचा फोन चेक करू शकतो का? काय आहे याविषयीचा नियम, प्रवासापूर्वी एकदा जाणून घ्या.

Train मध्ये TTE तुमचा फोन चेक करू शकतो? रेल्वेचा नियम माहिती आहे का?
Train Rules TTE
| Updated on: Jun 14, 2026 | 4:00 PM
Share

Train Rules: भारतीय रेल्वेत प्रवास करताना तिकीट तपासणीस (TTE) तिकीट तपासतो. ज्या प्रवाशांकडे ई-तिकीट असते, ते नेहमी मोबाईलवर तिकीट पाहतात. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, टीटीई तुमचा फोन पण तपासू शकतो का? TTE ला फोन हातात घेऊन तो तपासता येतो का? त्याला हा अधिकार आहे का? तो तुमचा फोन, त्यातील फोटो, मॅसेज वा इतर गोष्टी तपासू शकतो का? काय आहे याविषयीचा नियम?

TTE चे काम तरी काय?

तिकीट तपासणीचे महत्त्वाचे काम प्रवाशांचे तिकीट तपासणे हे काम आहे. याशिवाय तो सीट, आसन वाटप करणे, विना तिकीट प्रवासा करणाऱ्यांवर कारवाई करणे, यात्रेशी संबंधित नियमांचे पालन करण्याचे काम करतो. पण याचा अर्थ तो प्रवाशांची वैयक्तिक माहिती जाणून घेतो असा होत नाही. त्याला तुमचा मोबाईल डेटा, खासगी फोटो अथवा मॅसेज पाहण्याचा अधिकार नाही.

TTE तुमचा फोन तपासू शकतो का?

जर तुम्ही मोबाईलवर ई-तिकट बुक केले असेल तर टीटीई तिकिटाची सत्यता पडताळू शकतो. तो PNR क्रमांक, प्रवासाची माहिती, तिकिटाचे स्टेट तो चेक करू शकतो. नियमानुसार, TTE केवळ तिकिटाची सत्यता तपासू शकतो. पण तो तुमच्या फोनमधील वैयक्तिक फोटो, व्हिडिओ, चॅट, सोशल मीडियाचे अकाऊंट तपासू शकत नाही. अथवा तुमचे इतर खासगी मॅसेज वाचू शकत नाही. ते पाहू शकत नाही. तुम्हाला तो डेटा दाखवण्याची तो सक्ती करू शकत नाही.

TTE तुमचा फोन हातात घेऊ शकतो?

मोबाईलवर तिकीट पाहता येते. अनेक प्रकरणात TTE ला तुमचा मोबाईल हातात घेत नहाी. पण तिकीट स्पष्ट दिसत नसेल. काही तांत्रिक अडचण असेल तर मात्र तो मोबाईल हातात घेऊन तिकीट तपासू शकतो. पण तो केवळ तिकीट तपासू शकतो. फोन ताब्यात घेणे अथवा त्यातील मॅसेज वाचणे हे काही नियमात बसत नाही. तो नियमाबाहेर काही करू शकत नाही.

जर TTE चुकीचा व्यवहार करत असेल तर?

जर TTE चुकीचा व्यवहार करत असेल तर त्याच्याविरोधात तक्रार करता येते. तुम्ही टीटीईविरोधातील तक्रार रेल्वे हेल्पलाईन क्रमांक 139 वर कॉल करून देऊ शकता. RailMadad ॲप वर सुद्धा तुम्हाला तक्रार नोंदवता येते. तक्रार करताना कोच क्रमांक, ट्रेन क्रमांक आणि काय घडलं याची माहिती देणे आवश्यक आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी