रेल्वेच्या या 40 स्टेशनवर प्रवाशांना मिळणार खास सोयीसुविधा, रेल्वेची नवी योजना काय आहे…

| Updated on: Nov 04, 2022 | 4:45 PM

पुनर्विकासाचे काम येत्या 5 महिन्यांमध्येच सुरू होण्याची शक्यता आहे. देशभरातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासामुळे रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेला चांगलाच वेग मिळणार आहे.

रेल्वेच्या या 40 स्टेशनवर प्रवाशांना मिळणार खास सोयीसुविधा, रेल्वेची नवी योजना काय आहे...
Follow us on

नवी दिल्लीः भारतीय रेल्वे देशभरातील रेल्वे स्थानकांचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने प्रचंड वेगाने काम करत आहे.रेल्वे मंत्रालयानेही देशभरातील प्रमुख स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामाची आता घेतली आहे. भारतीय रेल्वेमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 40 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यामध्ये 14 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

यावरील पुनर्विकासाचे काम येत्या 5 महिन्यांमध्येच सुरू होण्याची शक्यता आहे. देशभरातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासामुळे रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेला चांगलाच वेग मिळणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

या स्थानकांच्या पुनर्विकासात भारतीय रेल्वेने प्रचंड छतावरील प्लाझा, फूड कोर्ट, वेटिंग लाउंज, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, स्थानिक उत्पादनांसाठी खास जागांची सुविधा तयार करण्यात आल्या आहेत.

विकासकामांमुळे रेल्वे स्थानक मेट्रो, बस इत्यादी वाहतुकीच्या विविध साधनांशी जोडले जाणार आहे. त्याच बरोबर शहराच्या दोन्ही बाजूंना स्थानकाशी जोडले जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

यासोबतच स्टेशनच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये ‘दिव्यांगजन’साठी ग्रीन बिल्डिंग तंत्रज्ञान आणि इतर सुविधांचा अवलंब करता येणार आहे. प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा बुद्धिमान इमारतीच्या संकल्पनेवर स्थानके विकसित केली जाणार आहेत.

स्थानकाचा पुनर्विकास रेल्वे प्रवाशांसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी स्टेशनवर ‘सिटी सेंटर’ सारख्या सुविधा विकसित करण्यात येणार आहे.

सार्वजनिक खाजगी भागीदारीअंतर्गत आनंद विहार टर्मिनलसह 16 स्थानकांच्या पुनर्विकासासाठी रेल्वे निविदा काढणार आहे. पुनर्विकासाच्या इतर स्थानकांमध्ये तांबरम, विजयवाडा, दादर, कल्याण, ठाणे, अंधेरी, कोईम्बतूर जंक्शन, पुणे, बंगळुरू शहर, वडोदरा, भोपाळ, चेन्नई सेंट्रल, दिल्ली हजरत निजामुद्दीन यांचा स्थानकांचा समावेश आहे.

पश्चिम मध्य रेल्वेच्या राणी कमलापती स्थानक, पश्चिम रेल्वेचे गांधीनगर राजधानी स्थानक आणि दक्षिण पश्चिम रेल्वेचे सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल स्थानक विकसित केले जाणार आहे.

ज्या रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे, त्यामध्ये अयोध्या, बिजवासन, सफदरजंग, गोमतीनगर, तिरुपती, गया, उधना, सोमनाथ, एर्नाकुलम, पुरी, न्यू जलपाईगुडी, मुझफ्फरपूर, लखनौ (चारबाग), डाकनिया तलाव, कोटा, जम्मू तवी, जालंधर कँट, नेल्लोर, साबरमती, फरिद भुवन, जयपूर, साबरमती , कोल्लम, उदयपूर शहर, जैसलमेर, रांची, विशाखापट्टणम, पुडुचेरी, कटपाडी, रामेश्वरम, मदुराई, सुरत, जोधपूर, चेन्नई एग्मोर, न्यू भुज यांचा समावेश असणार आहे.