‘टिपू एक्स्प्रेस’वरुन विचार आणि वारसाचं राजकारण तापलं; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी…

| Updated on: Oct 09, 2022 | 4:30 PM

टिपूने त्यांना छेडले असल्यामुळेच त्यांनी टिपूचे नाव काढून त्या जागी वोडेयार एक्स्प्रेस नाव दिल्याचे ओवेसींनी म्हटले आहे.

टिपू एक्स्प्रेसवरुन विचार आणि वारसाचं राजकारण तापलं; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी...
Follow us on

नवी दिल्लीः सध्या देशातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. कधी गुजरातमधील गरबा प्रकरणावरुन मुस्लिम युवकांना झालेली मारहाण असेल तर कधी म्हैसूर-बेंगळुरु टिपू एक्स्प्रेसच्या (Mysore-Bangalore Tipu Express) नाव बदल्यामुळे तापलेले राजकारण असेल. त्यावरुन केंद्रातील भाजपला (BJP) विरोधकांकडून आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींकडून (Asaduddin Owaisi) जोरदार टीका केली जात आहे.

टिपू एक्स्प्रेसचे नाव बदलून वोडेयार एक्स्प्रेस केले गेले असल्याने ओवेसी यांनी त्याबद्दल बोलताना सांगितले की, भाजपला टिपूने छेडले असल्यानेच त्यांनी टिपूचे नाव काढून टाकल्याची टीका ओवेसींनी केली आहे.

तर त्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय पलटवार करत म्हणाले की, भाजपला टिपूचा वारसा मिटवायचा नाही तर त्याचा खरा वारसा लोकांना सांगायची आमची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय रेल्वेने म्हैसूर-बेंगळुरू टिपू एक्सप्रेसचे नाव बदलून आता वोडेयार एक्सप्रेस असं नामाकरण केले आहे. त्यामुळे त्या नावावरुन आता राजकारण तापले आहे.

या प्रकरणावरुन भाजपवर निशाणा साधत एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, भाजप टिपूचा वारसा कधीही पुसून टाकू शकणार नाहीत. त्यावर भाजपनकडूनही ओवेसींना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

टिपू एक्स्प्रेसचे नाव बदलून वोडेयार एक्स्प्रेस केल्यामुळे ओवेसी यांनी भाजपवर निशाणा साधता म्हटले आहे की, टिपूने त्यांना छेडले असल्यामुळेच त्यांनी टिपूचे नाव काढून टाकल्याचे म्हटले आहे. टिपूनी इंग्रजांच्या विरोधात तीन युद्धं केली होती.

त्यावेळी टिपूने इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते, त्यामुळेच भाजपकडून टिपूला आजही धमकावले जात आहे. त्या गोष्टीवरुनच भाजपने चिडून एक्स्प्रेसचं नाव बदलले असल्याचे म्हटले आहे.

नाव बदललं असलं तरी ती टिपूचा भारतीय इतिरासातील वारसा कधीच कोणी पुसून टाकू शकणार नाही असंही त्यांनी सांगितले.

टिपू एक्स्प्रेस वरुन तापलेल्या या राजकारणावरुन भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत म्हणाले की, भाजपला टिपूचा वारसा मिटवायचा नाही.

उलट त्याचा खरा वारसा लोकांना कळावा अशी आमची इच्छा आहे. टिपू हा रानटी होता, ज्याने कूर्गमधील कोडावांवर, मंगळूरमधील सीरियन ख्रिश्चनांवर, कॅथलिक, कोकणी, मलबारच्या नायरांवर अन्याय आणि अनाठायी त्रास दिला होता.

टिपू हा स्वातंत्र्यसैनिक नव्हता मात्र तो फ्रेंच लोकांची मदत घेत होता. त्याकाळात टिपू जिंकलाच असता तर म्हैसूर ही पाँडिचेरीसारखी फ्रेंच वसाहत झाली असती अशी टीकाही त्यांनी केली आहे.

अफगाणिस्तानातून जमान शाहला भारतावर आक्रमण करून इस्लामी खिलाफत स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

यापूर्वी कर्नाटकातील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनीही नाव बदलावर आक्षेप घेतला होता. ते म्हणाले होते की, भाजपचे काम फक्त द्वेष पसरवणे एवढेच आहे.

भाजपचे काम फक्त द्वेषाचे राजकारण करणे एवढेच असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांना वोडेयारच्या नावाने दुसरी नवी ट्रेनही सुरू करता आली असती, मात्र त्यांना टिपूचे नाव बदलून वोडेयार असे का करावे लागले? या प्रश्नातच सगळ्या प्रश्नाची उत्तरं आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.