AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेकडून प्रवाशांना आणखी एक भेट, तिकीट आरक्षण प्रणालीत १० जुलैपासून असा बदल

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली एका बैठक झाली होती. त्या बैठकीत आरक्षण चार्ट आठ तास आधी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाच्या अंमलबजावणी करण्याचे आदेश रेल्वेने सर्व विभागांना दिले आहे.

रेल्वेकडून प्रवाशांना आणखी एक भेट, तिकीट आरक्षण प्रणालीत १० जुलैपासून असा बदल
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 07, 2025 | 8:04 AM
Share

रेल्वेने १ जुलैपासून तत्काळ आरक्षण प्रणालीत बदल केला. तत्काळ आरक्षणसाठी आधार प्रमाणीकरण सक्तीचे केले. तसेच रेल्वे एजंटांना तत्काळ आरक्षण खिडकी सुरु झाल्यावर अर्ध्या तासानंतर आरक्षणाच करता येणार आहे. या नियमामुळे आरक्षण मिळण्यासाठी प्रवाशांना फायदा होणार आहे. आता रेल्वेने आणखी एक सुधारणा आरक्षण प्रणालीत केली आहे. त्याचा फायदा वेटींग तिकीट (प्रतिक्षा यादी) असलेल्या प्रवाशांना मिळणार आहे. रेल्वेने येत्या १० जुलैपासून आरक्षण चार्ट हा आठ तास आधीच तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी चार तास आधी आरक्षण चार्ट तयार होत होता.

यापूर्वी असा होता नियम

रेल्वे बोर्डाच्या नवीन नियमानुसार, सर्व झोनमध्ये आरक्षण चार्ट १० जुलैपासून आठ तास आधी होणार आहे. यामुळे प्रतिक्षा यादीत तिकीट असणाऱ्या प्रवाशांना तुमचे तिकीट आरक्षित झाले की नाही हे आठ तास आधीच समजणार आहे. त्यापूर्वी प्रवाशांना चार तास आधी तिकीट आरक्षण झाले की नाही, समजत होते. त्यामुळे तिकीट आरक्षित न झाल्यास प्रवाशांना ऐनवेळी पर्यायी प्रवास करण्याचा पर्याय शोधावा लागत होता. परंतु आता आठ तास आधी तिकीट आरक्षण समजणार असल्यामुळे प्रवाशांना वेळ मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या झोनमध्ये १० तारखेपासून या प्रणालीची सुरुवात होणार आहे.

आता असा होणार चार्ट तयार

सुधारित चार्टच्या वेळापत्रकानुसार, ज्या गाड्या पहाटे ५ ते दुपारी २ दरम्यान धावतात, त्या गाड्यांचा चार्ट आदल्या दिवशी रात्री ९ वाजेपर्यंत तयार होणार आहे. तसेच ज्या गाड्या दुपारी २ ते रात्री ११.५९ पर्यंत दरम्यान धावतात त्यांचा चार्ट गाडी निघण्याच्या आठ तास आधी तयार आहे. रात्री १२ ते पहाटे ५ दरम्यान धावणाऱ्या गाड्यांचा चार्टसुद्धा गाडी निघण्याच्या आठ तासांपूर्वी तयार होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना फायदा होणार आहे.

काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली एका बैठक झाली होती. त्या बैठकीत आरक्षण चार्ट आठ तास आधी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाच्या अंमलबजावणी करण्याचे आदेश रेल्वेने सर्व विभागांना दिले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...