अमेरिकन पिझा कंपनीला भारतीय महिलेचा झटका, ‘या’ चुकीमुळे 1 कोटी नुकसान भरपाईची मागणी करत कोर्टात खेचलं

| Updated on: Mar 15, 2021 | 12:34 AM

एका भारतीय महिलेने थेट अमेरिकन पिझा कंपनीवर दावा ठोकत 1 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केलीय.

अमेरिकन पिझा कंपनीला भारतीय महिलेचा झटका, या चुकीमुळे 1 कोटी नुकसान भरपाईची मागणी करत कोर्टात खेचलं
Follow us on

नवी दिल्ली : एका भारतीय महिलेने थेट अमेरिकन पिझा कंपनीवर दावा ठोकत 1 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केलीय. पिझा कंपनीकडे संबंधित महिलेने एका व्हेज पिझाची ऑर्डर दिली, मात्र डिलिव्हरी बॉयने तिला नॉनव्हेज पिझा आणून दिल्याने महिलेने कंपनीला थेट ग्राहक कोर्टात खेचलंय. दीपाली त्यागी असं या महिलेचं नाव आहे. आपण शुद्ध शाकाहारी असून कंपनीच्या चुकीमुळे मांसयुक्त पिझा खावा लागला आणि आपल्या धार्मिक व्रताचा भंग झाल्याचा आरोप दीपाली यांनी केलाय (Indian women filed case against American Pizza company demand 1 crore rupees).

उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये राहणाऱ्या दीपाली त्यागी यांनी होळीच्या दिवशी सण साजरा केल्यानंतर भूक लागल्याने एका शाकाहारी पिझाची ऑर्डर दिली. मात्र, कंपनीने मोठा गोंधळ घातला. याबाबत सांगताना दीपाली म्हणाल्या, “डिलिव्हरी बॉय दिलेली ऑर्डर घेऊन वेळेवर आला नाही. तो जवळपास 30 मिनिटं उशिरा आला. तरीही मी याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याने आणलेला पिझा उघडून खाण्यास सुरुवात केली. भूक लागली असल्याने पटकन खाण्यास सुरुवात केली. मात्र, त्यात सोयाबीन नसून मासांचे तुकडे असल्याचं लक्षात आले.”

‘इतक्या मोठ्या चुकीसाठी संपूर्ण कुटुंबाला मोफत पिझा देण्याची ऑफर’

“यानंतर मी तात्काळ निष्काळजीपणा आणि शुद्ध शाकाहारील व्यक्तीला मांसाहार दिल्या प्रकरणी कस्टमर केअरकडे तक्रार केली. यानंतर संबंधित कंपनीच्या एका अधिकाऱ्याने या तक्रारीबाबत विचारणा करण्यासाठी फोन केला, मात्र इतक्या मोठ्या चुकीसाठी त्याने संपूर्ण कुटुंबाला मोफत पिझा देण्याची ऑफर दिली. यावेळी मी त्यांना ते समजतात इतकं हे सोपं नसल्याचं सांगितलं. त्यांच्या या चुकीमुळे माझी वर्षानुवर्षाची धार्मिक व्रतं भंग झालीत आणि त्यामुळे मला मानसिक धक्का बसलाय,” असंही दीपाली यांनी नमूद केलं.

‘कंपनीच्या एका चुकीमुळे वर्षानुवर्षाच्या धार्मिक परंपरा मोडल्या’

दीपालीने ग्राहक कोर्टात संबंधित आरोपी कंपनीकडून या चुकीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून 1 कोटी रुपये देण्याची मागणी केलीय. यावेळी त्यांनी कंपनीच्या एका चुकीमुळे वर्षानुवर्षाच्या धार्मिक परंपरा मोडल्या आणि जी व्रतं केली ती भंग झाल्याचा दावा दीपाली यांनी केला. तसेच याची नुकसान भरपाई म्हणून आरोपी कंपनीकडे 1 कोटी रुपयांची मागणी केली. तसेच या प्रकारामुळे जी मानसिक हानी झालीय त्याचीही भरपाई मागितलीय. सध्या या प्रकरणी न्यायालयाने पिझा कंपनीला यावर उत्तर देण्यास सांगितलंय. पुढील सुनावणी 17 मार्च 2021 रोजी होणार आहे.

हेही वाचा :

अमेरिकन कंपनीची जॉब ऑफर, नेटफ्लिक्स पाहण्यासोबत पिझ्झा खा आणि 40 हजार कमवा

रस्त्यावर पिझ्झाचा बॉक्स फेकणे पडले महागात; 80 किलोमीटर मागे जाऊन कचरा उचलण्याची वेळ

पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण, 72 जण क्वारंटाईन

व्हिडीओ पाहा :

Indian women filed case against American Pizza company demand 1 crore rupees