AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्त्यावर पिझ्झाचा बॉक्स फेकणे पडले महागात; 80 किलोमीटर मागे जाऊन कचरा उचलण्याची वेळ

आता चांगल्या भाषेत सांगून हा तरुण ऐकत नाही म्हटल्यावर सचिव मादेतिरा थिम्हा यांनी हा तरुण राहत असलेल्या स्थानिक पोलीस ठाण्याला सगळी माहिती कळविली. | Karnataka

रस्त्यावर पिझ्झाचा बॉक्स फेकणे पडले महागात; 80 किलोमीटर मागे जाऊन कचरा उचलण्याची वेळ
| Updated on: Nov 05, 2020 | 5:40 PM
Share

बंगळुरु: ट्रेन, बस किंवा अन्य वाहनांनी प्रवास करताना लोकांकडून रस्त्यावर फेकला जाणारा कचरा पाहून आपल्यापैकी अनेकांना चीड येत असेल. अशा महाभागांना कचरा टाकण्यापासून रोखले, तरी बऱ्याचदा ते ऐकत नाहीत. मात्र, कर्नाटकमध्ये रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या दोन तरुणांना प्रशासनाने चांगलीच अद्दल घडवल्याचा प्रकार समोर आला आहे. हे दोन तरुण मडिकेरीवरुन 80 किलोमीटरचा प्रवास करुन कूर्गला पोहोचले होते. या प्रवासादरम्यान या तरुणांनी पिझ्झा खाल्ला. मात्र, त्याचे बॉक्स कचरापेटीत न फेकता रस्त्याच्या कडेला फेकून दिले. यानंतर हे दोन्ही तरुण कूर्गला आपल्या घरी निघून आले. (Tourists Who Dumped Pizza Boxes Go Back 80Kms To Pick Up Trash)

मात्र, या तरुणांचे नशीब इतके खराब निघाले की, रस्त्याच्या कडेला फेकलेले हे पिझ्झाचे बॉक्स नेमके कूर्ग पर्यटन संघटनेचे सचिव मादेतिरा थिम्हा यांच्या नजरेस पडले. काही दिवसांपूर्वीच या सचिवांनी स्थानिक ग्रामस्थांच्या साहाय्याने या परिसराचे सौदर्यं टिकवण्यासाठी सफाई मोहीम राबवली होती. त्यामुळे रस्त्यावरचा कचरा बघून त्यांचा पार चांगलाच चढला. त्यानंतर मादेतिरा थिम्हा यांनी पोलिसांना तपासाचे आदेश दिले.

तपासादरम्यान पोलिसांना पिझ्झा बॉक्सच्या आतमध्ये बिल आढळून आले. या बिलावर कचरा करणाऱ्यांपैकी एका तरुणाचा नंबर होता. कूर्ग पर्यटन संघटनेच्या सचिवांनी या तरुणाला फोन करुन कचरा उचलण्याची विनंती केली. मात्र, या तरुणाने मुजोरी दाखवत परत येण्यास नकार दिला.

आता चांगल्या भाषेत सांगून हा तरुण ऐकत नाही म्हटल्यावर सचिव मादेतिरा थिम्हा यांनी हा तरुण राहत असलेल्या स्थानिक पोलीस ठाण्याला सगळी माहिती कळविली. यानंतर पोलिसांनी ही माहिती सोशल मीडियावर टाकत या तरुणाचा नंबर सोशल मीडियावर शेअर केला. अखेर अनेकजणांनी फोन केल्यानंतर या तरुणाला अखेर उपरती झाली.

यानंतर हा तरुण पुन्हा 80 किलोमीटरचा प्रवास करुन मडिकेरी येथील गावात पोहोचला आणि त्याने हा कचरा उचलला. या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे कूर्ग पर्यटन संघटनेचे सचिव मादेतिरा थिम्हा आणि पोलिसांचे सध्या सोशल मीडियावर चांगलेच कौतुक आहे. आता या घटनेपासून बोध घेऊन भविष्यात लोकलाजेस्तव का होईना, अशा महाभागांना अक्कल येईल, अशी आहे.

(Tourists Who Dumped Pizza Boxes Go Back 80Kms To Pick Up Trash)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.