पाकिस्तानला वेगळे पाडण्यासाठी भारताचे आणखी एक पाऊल, या मुस्लीम देशाला दिली मोठी ऑफर

भारताच्या काश्मीर-पहलगाम पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला वेगळे पाडण्याची भारताने तयारी केली आहे. आता एका मुस्लीम देशाला भारताने मोठी ऑफर दिली आहे.

पाकिस्तानला वेगळे पाडण्यासाठी भारताचे आणखी एक पाऊल, या मुस्लीम देशाला दिली मोठी ऑफर
| Updated on: Aug 29, 2025 | 3:42 PM

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांची हत्या केल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यात पाकिस्तानातील अतिरेकी अड्डे नष्ट करीत पाकिस्तानला जगासमोर उघडे पाडले. याआता भारताने पाकिस्तानला वेगळे पाडण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे आणि सौदी अरबला मोठी ऑफर दिली आहे. ही ऑफर २८ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत झालेल्या भारत – सौदी अरब संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या ७ व्या बैठकीत देण्यात आली आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या मते या बैठकीचे सहायक अध्यक्ष परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव अमिताभ प्रसाद आणि सौदीच्यावतीने स्टाफ मेजर जनरल साद मोहम्मद एच अलकाथिरी यांनी भूषवले. दोन्ही देशांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी सुदृढ करण्याचे निश्चित केले. तसेच गेल्या संयुक्त सुरक्षा सहकार्य समितीच्या बैठकीत घेतलेले बहुतांश निर्णय अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानचे सैन्य सौदीला देते प्रशिक्षण

संरक्षण संबंध मजबूत करणे आणि सहकार्यासाठी नवीन क्षेत्र निवडण्यासाठी दोन्ही देशांनी प्रशिक्षण सहकार्य, औद्योगिक भागीदारी, सुमद्री सहकार्य आणि अन्य सैन्य प्रशिक्षणासंदर्भात चर्चा केल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.दोन्ही देशांनी आपले प्रशिक्षण क्षमता आणि गरजांवर व्यापक चर्चा केली आहे. भारताने सौदी सैन्य दलांना प्रशिक्षण देण्याची ऑफर दिली आहे आणि सायबर, आयटी, डिझास्टर मॅनेजमेंट आणि धोरणात्मक संचार सहकार्याबद्दल बोलणी केली आहेत.

वास्तविक सौदी अरबच्या सैन्य दलाला पाकिस्तानचे सैन्य प्रशिक्षण देत आले आहे. पाकिस्तानच्या सैन्याने सौदी अरबमध्ये अनेक संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम घेतले आहेत. तसेच पाकिस्तानातही प्रशिक्षण दिलेले आहे. दोन्ही देशात मजबूत आणि अनेक वर्षांचे सैन्य संबंध सुरु आहेत. याचा उद्देश्य सैन्य क्षमतांना वाढवणे आणि विशेष कौशल्याचे अदान-प्रदान करण्यासाठी संयु्क्त हवाई-जमीनी आणि समुद्री अभ्यास दोन्ही देशात सुरु असतो. सौदी अरबमध्ये १९८२ ते १९८७ पर्यंत पवित्र स्थळांच्या संरक्षणासाठी एक मोहिम आणि फेब्रुवारी २०१८ मध्ये एक प्रशिक्षण आणि एडव्हायझरी मिशन सामील आहेत.

संरक्षण उपकरणांसाठी सौदीशी भारताने केली चर्चा

भारतीय तज्ज्ञांनी भारतीय संरक्षण निर्मिती क्षेत्रातील भारताच्या वाढत्या क्षमतेचा उल्लेख केला आणि भारतात निर्मित अत्याधुनिक शस्रास्रांचे प्रदर्श केले आहे.या चर्चेत सौदी अरब सोबत उपकरणांची संयुक्त निर्मिती आणि भागीदारीवर चर्चा झाली. दोन्ही पक्षांनी या वर्षी नौसेना आणि थळ सेना स्टाफ चर्चेच्या यशस्वी आयोजनावर आनंद व्यक्त केला आहे. भारत आणि सौदी अरब दरम्यानची संरक्षण भागीदारी सातत्याने वाढत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एप्रिल २०२५ मध्ये सौदी अरेबिया भेटीदरम्यान धोरणात्मक भागीदारी परिषदेअंतर्गत संरक्षण सहकार्यावरील मंत्रीस्तरीय समितीच्या स्थापनेतून हे दिसून आले आहे..