देशातील नंबर -1 मुख्यमंत्री कोण? सर्व्हेत या मुख्यमंत्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब

फेम इंडिया-आशिया पोस्टने केलेल्या सर्व्हेनुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री ठरले आहेत, त्यांना 1000 पैकी 897 गुण मिळाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मुख्यमंत्री पंचरत्न' श्रेणीत अव्वल ठरले आहेत. मुख्यमंत्र्यांचे नेतृत्व, कार्यशैली, लोकप्रियता आणि प्रशासकीय क्षमता या मापदंडांवर आधारित हा सर्व्हे आहे.

देशातील नंबर -1 मुख्यमंत्री कोण? सर्व्हेत या मुख्यमंत्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब
himanta biswa sarma
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 01, 2026 | 8:30 PM

फेम इंडिया-आशिया पोस्टने देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्याचा सर्व्हे केला आहे. Fame India–Asia Post Survey 2026 मध्ये देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची निवड करण्यात आली आहे. तर, ‘मुख्यमंत्री पंचरत्न’ या विशेष श्रेणीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अव्वल ठरले आहेत. फेम इंडिया मॅगजीन आणि एशिया पोस्टने हा सर्व्हे जाहीर केला आहे. या सर्व्हेत मुख्यमंत्र्यांचं नेतृत्व, कार्यशैली, लोकप्रियता आणि प्रशासकीय क्षमता आदींचा विचार करूनच ही यादी जाहीर करण्यात आली आहे. यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 1000 पैकी 897 गुण मिळाले असून ते अव्वल ठरले आहेत. योगींचे नेतृत्व, कार्यशैली आणि प्रशासकिय क्षमतेच्या आधारे त्यांना पहिली रँक मिळाली आहे.

फेम इंडिया मॅगजीन आणि एशिया पोस्टने एक सर्व्हे केला होता. त्यासाठी त्यांनी देशातील सर्वश्रेष्ठ मुख्यमंत्री निवडण्यासाठी त्यांनी 10 मापदंड तयार केले होते. त्यात सुशासन, कायदा सुव्यवस्था, व्यक्तिमत्त्व, प्रतिमा, कार्यक्षमता, खात्यांची समज, लोकप्रियता, दूरदृष्टिपणा आणि कार्यशैलीचा समावेस होता. या सर्वांमध्ये योगी आदित्यनाथ हे सरस ठरले आहेत.

Loading...

म्हणून नंबर दिला

सर्व्हेच्या अंतर्गत सुशासनात प्रशासकीय पारदर्शिता, उत्तरदायित्व, नागरिकांना सेवा देण्याची व्यवस्था आणि प्रशासकीय गुणवत्तेला आधार बनवलं होतं. तर कायदा सुव्यवस्थेचं आकलन, कायद्याचं राज्य, गुन्हे रोखण्यसारख्या मुद्द्यांचा त्यात समावेश होता. याशिवाय नेतृत्त्व क्षमता, संवाद, निर्णय घेण्याची क्षमता आणि सार्वजनिक आचरणाच्या आधारावरही मुख्यमंत्र्यांचं मूल्यांकन करण्यात आलं होतं.

1000 गुणांमध्ये ठरले सरस

सर्व्हेत सर्व मुख्यमंत्र्यांना 1000 गुण द्यायचे होते. मुख्यमंत्र्यांना त्यांचे राज्य शासन प्रशासनसहीत अनेक मुद्द्यांवर नंबर देण्यात आले. सर्व्हेत लोकप्रियता आणि लोक स्वीकृतीसह योजना, भविष्यातील तयारी आणि धोरणात्मक निर्णयाचे परिणाम आदींनाही महत्त्व दिलं गेलं.

योगी, धामी आणि…

या सर्व्हेत योगी आदित्यनाथ हे 897 गुण मिळवून अव्वल ठरले आहेत. तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी 881 गुण घेऊन दुसरे आले आहेत. तिसऱ्या स्थानावर आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा आहेत. त्यांना 874 गुण मिळाले आहेत. तर पजांबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे 856 गुण घेऊन चौथ्या स्थानी आहेत.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन 844 गुण घेऊन पाचव्या, तर 842 गुण घेऊन आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे सहाव्या, 838 गुणांसह सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग सातव्या, 827 गुण घेऊन तेलंगनाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आठव्या, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे 803 गुण घेऊन नवव्या आणि 802 गुण घेऊन मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा हे दहाव्या स्थानी आहेत.

पंचरत्नांमध्ये फडणवीस अव्वल

तर सर्व्हेच्या दुसऱ्या कॅटेगिरीत पाच मुख्यमंत्र्यांची ‘मुख्यमंत्री पंचरत्न’ म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यात 788 गुण घेऊन देवेंद्र फडणवीस अव्वल ठरले आहेत. तर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता 768 गुण घेऊन दुसऱ्या ठरल्या आहेत. 766 घेऊन घेऊन जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला तिसऱ्या स्थानी आहेत. तर 760 गुणांसह गुजरातचे भूपेंद्रभाई पटेल चौथ्या आणि 746 गुणांसह राजस्थानचे भजनलाल शर्मा पाचव्या स्थानी आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us