
भारताच्या डीआरडीओने एक अमोघ असे अस्रं तयार केले आहे. या अस्राने शत्रूची विमाने क्षेपणास्रं,ड्रोन हवेतल्या हवेतच नष्ट करणे शक्य होणार आहे. यामुळे देशाची संरक्षण सिद्धता वाढणार आहे.या प्रकारचे तंत्रज्ञान मिळविणारा भारत अमेरिका, चीन आणि रशियानंतरचा तिसरा देश आहे. या नव्या शस्राची चाचणी डीआरडीओने अलिकडेच घेतली आहे. भारतीय डीआरडीओच्या या नव्या ३० किलोवॅट क्षमतेच्या लेसर-आधारित शस्त्र प्रणालीचा वापर करून स्थिर-विंग असलेली विमाने, क्षेपणास्त्रे आणि ग्रुप ड्रोन हवेतल्या हवेत नष्ट करता येणार आहेत, त्यामुळे देशाच्या संरक्षण तंत्रज्ञानातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) हे लेझर आधारित शस्त्र (DEW) विकसित केले आहे, जे आता लष्करातील वापरासाठी उत्पादित आणि तैनातीसाठी सज्ज होणार आहे. या डीआरडीओच्या या कामगिरीने भारत अमेरिका, चीन आणि रशियासह प्रगत लेसर शस्त्र क्षमता असलेल्या देशांच्या उच्चभ्रू गटात भारताचा समावेश झाला आहे.
येथे व्हिडीओ पाहा –
#WATCH | Kurnool, Andhra Pradesh: For the first time, India has showcased its capability to shoot down fixed-wing aircraft, missiles and swarm drones using a 30-kilowatt laser-based weapon system. India has joined list of selected countries, including the US, China, and Russia,… pic.twitter.com/fjGHmqH8N4
— ANI (@ANI) April 13, 2025
या प्रयोगशाळेने इतर डीआरडीओ प्रयोगशाळा, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांशी साधलेला समन्वय साधून हे शस्र तयार केले आहे.ही तर प्रवासाची सुरुवात आहे. मला खात्री आहे की आपण लवकरच आपले ध्येय गाठू. आता आम्ही उच्च ऊर्जा मायक्रोवेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स सारख्या इतर उच्च ऊर्जा प्रणालींवर देखील काम करीत आहोत. आम्ही अशा अनेक तंत्रज्ञानावर काम करीत आहोत ज्यामुळे आपल्याला स्टार वॉर्स क्षमता मिळेल. आज तुम्ही जे पाहिले ते स्टार वॉर्स तंत्रज्ञानाच्या घटकांपैकी एक होते असे डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी म्हटले आहे. “माझ्या माहितीनुसार, अमेरिका, रशिया आणि चीनने याआधी ही क्षमता दाखवली आहे. इस्रायल देखील अशाच क्षमतांवर काम करीत आहे, मी म्हणेन की ही प्रणाली दाखवणारा भारत जगातील चौथा किंवा पाचवा देश आहे,असेही कामत यांनी म्हटले आहे.
३० किलोवॅट क्षमतेची ही लेसर शस्र प्रणाली ५ किलोमीटरच्या परिसरात ड्रोन आणि हेलिकॉप्टरसारख्या हवाई हल्ल्यांच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी डिझाईन केली आहे. या प्रणातील अत्यंत प्रगत इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमता आहेत, ज्यामध्ये संप्रेषण आणि उपग्रह सिग्नल जॅम करण्याची देखील ताकद आहे.अचूक लक्ष्य वेध करण्यासाठी ही प्रणाली ३६०-डिग्री इलेक्ट्रो-ऑप्टिकल/इन्फ्रारेड (EO/IR) सेन्सरने सुसज्ज आहे आणि ती हवाई, रेल्वे, रस्ते किंवा समुद्राद्वारे वेगाने कुठेही नेऊन तैनात केली जाऊ शकते.