अतिरेकी तहव्वुर राणा याचे गाव चर्चेत, पण गावकऱ्यांचा जीव या कारणाने धोक्यात? का ते वाचा ?
पाच हजार गावकरी सध्या वेगळ्यात कारणांनी चिंतेत आहेत. या गावातील लोकांच्या चिंतेचे कारण ना दहशतवाद, सुरक्षा हे नाही. तरी येथील सामान्य गावकऱ्यांचा जीव धोक्यात मात्र आहे.

तहव्वुर राणा याला अमेरिकेतून भारताच्या ताब्यात दिले आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजीच्या पाकपुरस्कृत हल्ल्याचा एक मास्टरमाईंड असलेल्या तहव्वूर राणा याने त्याचा आणखी एक साथीदार डेव्हीड कोलमन हेडली याच्या सोबत भारतातील महत्वाच्या स्थळांची रेकी केली होती. तहव्वूर राणा याचे गाव अनोख्या कारणासाठी चर्चेत आले आहे. तहव्वूर राणा याच्या गावातील मंडळींचा जीव मात्र धोक्यात सापडला आहे. पाच हजार वस्तीचे हे गाव जगाच्या नकाशावर आले आहे. काय आहे या गावात ?
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात चीचा वतनी हे गाव तहव्वूर राणा याचे गाव सध्या चर्चेत आहे. हे गावकरी हळूहळू पसरणाऱ्या विषाने त्रस्त झाले आहेत. हे विष जमीनीतील पाण्यात मिसळलेले आहे. या गावातील पाण्याने या गावकऱ्यांची जगणे हराम केले आहे. तहव्वूर राणा याचे पाकिस्तानाच्या पंजाब प्रातांतील चीचा वतनी गावातील पाणी भुजल दुषित झाल्याने पिण्यायोग्य नाही. या गावातील पाण्यात आर्सेनिक आणि टोटल डिझॉल्व सॉलिड्स ( TDS) चे प्रमाण मानकांपेक्षा तब्बल ७०० पट अधिक आहे.जी मानवी जीवनास अत्यंत धोकादायक आहे.
पब्लिक हेल्थ इंजिनिअर लॅबने केलेल्या चाचणीत गावातील हँडपंप आणि ट्युबवेलच्या पाण्यात आर्सेनिकचे प्रमाण ५० ते २०० मायक्रोग्रॅम प्रति लीटरपर्यंत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते मानवी जीवनास १० मायक्रोग्रॅमपर्यंतचे प्रमाण सुरक्षित मानले जाते. त्याहून आर्सेनिकचे प्रमाण कित्येक पट जास्त आहे. टीडीएसचे प्रमाण ६९९ ते २,२३० पीपीएम पर्यंत आहे. मानवासाठी हे प्रमाण ५० ते १५० इतके असायला हवे. त्यामुळे हे पाणी पिण्या योग्य नाही. जनावरांना देखील हे पाणी पिण्याच्या योग्य नसल्याचे म्हटले जाते.




अनेक आजारांनी त्रस्त
गावातील पाण्याच्या प्रदुषणाने अनेक लोग आजारी पडले आहेत. स्थानिक त्वचा रोग तज्ज्ञांनी एका रुग्णाची तपासणी केली तेव्हा त्यांना आर्सेनिक संबंधित कॅन्सरचा संशय आला आणि त्यांनी पाण्याची तपासणी केली. त्यानंतर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट, जिल्हा प्रशासन, एग्रीकल्चरल डिपोर्टमेंट आणि ज्युडीशियल वॉटर एंड एन्व्हार्यमेंट कमीशन यांची झोप उडाली. आतापर्यंत अडीचशे हून अधिक गावकऱ्यांना विविध प्रकाराच्या व्याधी जडल्या आहेत.
एक दिवसाला केवळ 2000 लिटर पाणी
गावातील RO वॉटर प्लांट आधीच बंद पडला होता. त्याला आता पुन्हा चालू केले आहे. सध्या येथे २,००० लिटर पाणी पुरवठा केला जात आहे. गावकऱ्यांना हॅण्डपंप आणि विहीरीचं पाणी पिण्यास मनाई केली आहे. स्थानिक आरोग्य कार्यकर्ते जनप्रबोधन करीत आहेत. शेतीसाठी सध्या दिलासा आहे कारण शेतीसाठी कालव्याचे पाणी वापरले जात आहे.
ही समस्या नैसर्गिक असल्याचा दावा
ही समस्या नैसर्गिक आहे आणि कोणत्याही औद्योगिक प्रदुषणाने निर्माण झालेली नाही. खोलवर खोदकाम केल्यानंतर पाण्यात आर्सेनिक आणि टीडीएसचे प्रमाण कमी आढळून आले. सध्या, प्रशासन दीर्घकालीन उपाय म्हणून सार्वजनिक पाणी योजनेवर काम करत आहे. जेणेकरून गावाला कायमचे सुरक्षित पिण्याचे पाणी मिळू शकेल असे उपायुक्त इम्तियाज खिची यांनी म्हटले आहे.