AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियाचा युक्रेनवर भयानक हल्ला, बॅलिस्टीक क्षेपणास्रे डागली, 21 जणांचा मृत्यू…शाळा आणि रस्ते बरबाद झाले

रशियाने युक्रेनच्या सुमी शहरावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे, ज्यामध्ये २० हून अधिक लोक ठार झाले आहेत. रविवारी लोक चर्चमध्ये जात असताना हा हल्ला झाला आहे.

रशियाचा युक्रेनवर भयानक हल्ला, बॅलिस्टीक क्षेपणास्रे डागली, 21 जणांचा मृत्यू...शाळा आणि रस्ते बरबाद झाले
| Updated on: Apr 13, 2025 | 4:30 PM
Share

रशिया आणि युक्रेनचे युद्ध आता भयानक वळणावर पोहचले आहे. युक्रेनच्या सुमी शहरात रशियाने बॅलिस्टीक क्षेपणास्रे डागली आहेत. रविवारी झालेल्या या विध्वंसक हल्ल्यात २१ हून अधिक लोक ठार झाले आहेत. या हल्ल्यात निवासी भागातील शाळा, रस्ते उद्धवस्त झाले आहेत. युक्रेनने आता जगाला रशियाविरोधात दबाव आणण्यासाठी आवाहन केले आहे. हा हल्ला रशिया आणि युक्रेन युद्धाला धोकादायक वळणावर घेऊन जाऊ शकतो असे म्हटले जात आहे.

रशिया आणि युक्रेनचे युद्ध आता धोकादायक वळणावर जाऊन पोहचले आहे. रशियाने युक्रेनच्या सुमी नावाच्या शहरावर बॅलिस्टीक क्षेपणास्रांनी हल्ले चढवले आहे. त्यामुळे सुमी शहरातील निवासी भागातील शाळा, इमारती, कार आणि सार्वजनिक रस्ते सर्वकाही नष्ट झाले आहे. रविवारी लोक चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जात असताना झाला आहे. हा हल्ला रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा टर्निंग पॉईट ठरु शकतो असे म्हटले जात आहे. यानंतर हे युद्ध आता भयानक वळणावर पोहचल्याचे म्हटले जात आहे.

येथे पोस्ट शेअर करा –

सुरुवातीला मिळालेल्या माहीतीनुसार या हल्ल्यात सुमारे २१ जण ठार झाले आहेत. या हल्ल्यात शहरातील दैनंदिन जीवन नष्ट झाले आहे. निवासी इमारती, रस्ते मार्ग आणि शाळांच्या इमारती आणि रस्त्यांवरील कारना निशाणा बनविण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर बचाव मोहिम सुरु झालेली आहे. घटनास्थळावर संबंधित यंत्रणांचे अधिकारी पोहचले असून मदत कार्य वेगाने सुरु आहे.

यूक्रेनचे जगाला आवाहन –

यूक्रेनच्या वतीने आवाहन केले आहे की जगाला दृढतेने प्रतिकार करायला हवा. अमेरिका, युरोप, जगातील प्रत्येक जण युद्ध आणि हत्या यांना संपवण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. रशियाला मात्र याच प्रकारचा दहशतवाद पाहीजे आणि तो युद्धात खेचत आहे. रशियाच्या दबावा शिवाय शांतता अभाव आहेत. राजकीय चर्चा बॅलिस्टीक मिसाईल आणि हवाई बॉम्बना रोखू शकत नाही. रशियावरील दबावा शिवाय शांतता अशक्य आहे. रशियाच्या विरोधात भूमिका घेणारा हवा आहे अशी प्रतिक्रीया युक्रेनने व्यक्त केली आहे.

Follow Us
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया