मोठी बातमी! युद्ध सुरू असतानाही इराणने मैत्री जपली, पाकिस्तानला जे पाहिजे होतं ते भारताला दिलं, पाकिस्तानमध्ये नुसता जळफळाट…

युद्धातही इराणने मैत्री जपली आहे, इराणने भारतासाठी मोठा निर्णय घेतला. इराणच्या या निर्णयानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाल्याचं पहायला मिळत आहे. युद्धात आम्ही मदत करायची आणि फायदा भारताला असं पाकिस्तानने म्हटलं आहे.

मोठी बातमी! युद्ध सुरू असतानाही इराणने मैत्री जपली, पाकिस्तानला जे पाहिजे होतं ते भारताला दिलं, पाकिस्तानमध्ये नुसता जळफळाट...
motozba khamenei
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 16, 2026 | 8:18 PM

इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होमूर्ज स्ट्रेट बंद केला आहे. होमूर्ज स्ट्रेट बंद झाल्यामुळे सध्या जगभरात भीषण इंधन टंचाई निर्माण झाली आहे. मात्र अशाही परिस्थितीमध्ये इराणने भारताच्या जहाजांना स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून जाण्याची परवानगी दिली आहे. भारताचे दोन जहाज शिवालिक आणि नंदा देवी 92,712 मेट्रिक टन गॅस घेऊन भारताच्या दिशेनं येत आहेत. मात्र ही बातमी ऐकून पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. पाकिस्तानच्या एक्सपर्टकडून इराणच्या या निर्णयावर चांगलीच नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पाकिस्तानी एक्सपर्ट कमर चिमा यांनी इराणला यावरून चांगलंच सुनावलं आहे. इराणने भारताची जहाजं होर्मूज स्ट्रेटमधून सोडली आहेत, मग पाकिस्तानची जहाजं का सोडण्यात येत नाहीत? असा जबाब पाकिस्तानी सरकारने इराणला विचारावा असं चिमा यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे इराणच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमधील नागरिक देखील चांगलेच नाराज झाले आहेत.

कमर चिमा यांनी पुढे बोलताना म्हटलं की भारतामधील इराणच्या राजदुतानं म्हटलं की होमूर्ज स्ट्रेट मार्गे भारताची जहाज जाऊ शकतात. मात्र त्यानंतर इराणने सर्व जहाजांना या मार्गाने जाण्यास प्रतिबंध केला. मग भारताला इराणकडून जी सुविधा मिळाली ती पाकिस्तानला का मिळाली नाही? ही सुविधा इराण पाकिस्तानला देणार आहे की नाही? असा प्रश्न चिमा यांनी इराणला विचारला आहे. त्यांना युद्धात आम्ही मदत करणार आणि ते सुविधा भारताला देणार अशा शब्दात याबद्दल पाकिस्तानकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान इराणने होमूर्ज स्ट्रेट बंद केल्यानंतर आता संपूर्ण जगात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी आता ट्रम्प यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी जागतिक स्तरावर नौदलाची आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यासाठी त्यांनी अनेक देशांना तसं आवाहन देखील केलं आहे, सर्व देशांनी आपल्या युद्धनौका होर्मूज स्ट्रेटमध्ये आणाव्यात असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या या आवाहनाला नाटो देशांनीच नकार दिला आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us