चंद्रयान-3 च्या लॅंडर-रोव्हरला कोणत्या गोष्टीपासून मोठा धोका, इस्रो प्रमुखांनी ‘या’ धोक्याकडे लक्ष वेधले

चंद्रयान-3 चा विक्रम लॅंडरने बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग केले आहे. लॅंडरमधून रोव्हर प्रज्ञान खाली उतरून चंद्राच्या पृष्टभागावर फिरत आहे. परंतू त्याला यामुळे धोकाही येऊ शकतो.

चंद्रयान-3 च्या लॅंडर-रोव्हरला कोणत्या गोष्टीपासून मोठा धोका, इस्रो प्रमुखांनी या धोक्याकडे लक्ष वेधले
isro s. somnath
Image Credit source: socialmedia
| Updated on: Aug 26, 2023 | 5:34 PM

नवी दिल्ली | 26 ऑगस्ट 2023 : भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-3 चे यशस्वी सॉफ्ट लॅंडींग करुन एक अनोखा इतिहास रचला आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लॅंडींग करणार अमेरिका, रशिया आणि चीन नंतर आता भारत चौथा देश बनला आहे. तर दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा जगातला पहिला देश बनला आहे. इस्रोचे अध्यक्ष एस.सोमनाथ यांनी गुरुवारी सांगितले की चंद्रयान-3चा लॅंडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान दोघे चांगले काम करीत आहेत. दोघांचे मिशन ठरल्याप्रमाणे 14 दिवसाचं आहे. परंतू त्यांनी मोहीमेत येऊ शकणाऱ्या धोक्याबद्दलही सावधान केले आहे.

चंद्रयान-3 चे चंद्रावर बुधवारी यशस्वी लॅंडींग केले आहे. त्यासंदर्भात माहीती देशाना पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना इस्रोचे चेअरमन यांनी सांगितले की चंद्रयान-3 च्या लॅंडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान दोन्ही एकदम कार्यरत असून त्यांनी काम सुरु केले आहे. पुढेही त्यांचे काम सुरु राहील. परंतू चंद्रावर वातावरण नाही. त्यामुळे अशाच एखादी वस्तू चंद्रयान-3 ला धडकू शकते. तसेच थर्मल प्रॉब्लेम आणि कम्युनिकेशन ब्लॅकआऊट सारखी समस्या देखील येऊ शकते.

एस. सोमनाथ यांचे ट्वीट येथे पाहा –

चंद्रावर कोणत्याही वातावरणाचा थर नाही

इस्रोचे चेअरमन एस.सोमनाथ यांनी पुढे सांगितले की जर एखादा अत्यंत छोटा ग्रह किंवा अवकाशातील फिरणारे दगड जरी प्रचंड वेगाने चंद्रयान-3 ला धडकले तर लॅंडर आणि रोव्हर नष्ट होऊ शकतात. चंद्रावर पडलेले खड्डे अशाच अशनी आणि उल्काचा आघातांनी तयार झाले आहेत. पृथ्वीवर देखील दर तासाला असे लाखो अंतराळातील अशनी कोसळत असतात. परंतू पृथ्वी भोवतालच्या वातावरणाच्या थरामुळे ते आत येण्याआधीच जळून हवेतल्या हवेत नष्ट होतात. चंद्रावर असे कोणतेही वायूमंडल किंवा वातावरण संरक्षणासाठी उपलब्ध नाही असेही ते म्हणाले.

पहीली सुर्य मोहीम पुढच्या महिन्यात लॉंच

चंद्रयान-3 च्या यशस्वी सॉफ्ट लॅंडींग नंतर आता इस्रोने येत्या 2 सप्टेंबर 2023 रोजी आपली पहिली सुर्यावरील मोहीम सुरु करण्याची घोषणा केली आहे. या मोहीमेचे नाव आदित्य-एल-1 (Aditya-L1) असे असणार आहे. या आदित्य एल-1 ला श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून PSLV रॉकेटच्या सहाय्याने लॉंच केले जाणार आहे. आदित्य-एल-1 ला 15 लाख किलोमीटर अंतराचा प्रवास 127 दिवसात पूर्ण करणार आहे. सूर्य आणि पृथ्वी दरम्यान पॉईंट हॅलो ऑर्बिटमध्ये आदित्य-एल-1 तैनात केले जाणार आहे. ते याच ठीकाणावरुन सूर्याचा अभ्यास करणार आहे.