AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘इंटरव्ह्यूमध्ये मला विष पाजलं’, ISRO च्या शास्त्रज्ञांचा FB वर धक्कादायक खुलासा

मला विष देण्यात आलं होतं पण त्यातून मी बचावलं असं तपन मिश्रा यांनी फेसबूकवर म्हटलं आहे. त्यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

'इंटरव्ह्यूमध्ये मला विष पाजलं', ISRO च्या शास्त्रज्ञांचा FB वर धक्कादायक खुलासा
| Edited By: | Updated on: Jan 05, 2021 | 11:51 PM
Share

नवी दिल्ली : इस्त्रोचे (ISRO) वैज्ञानिक आणि अहमदाबाद स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे माजी संचालक तपन मिश्रा (Tapan Mishra) यांनी फेसबूकवर धक्कादायक दावा केला आहे. मला विष देण्यात आलं होतं पण त्यातून मी बचावलं असं तपन मिश्रा यांनी फेसबूकवर म्हटलं आहे. त्यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रमोशन इंटरव्ह्यूच्या वेळी त्यांना नाश्त्यामध्ये विष मिसळून देण्यात आलं होतं असं तपन मिश्रा यांनी सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकवर एक पोस्ट लिहून म्हटलं आहे. (isro scientist shocking fb post tapan mishra claims poisoned)

यावेळी मिश्रा यांनी लिहिले की, विषबाधामुळे त्यांच्या शरीरातील 30 ते 40 टक्के रक्त कमी होतं. यामुळे गुद्द्वारातून रक्तस्त्राव देखील झाला होता. त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. यावेळी त्यांची तब्येत अत्यंत नाजूक असल्याचंही त्यांनी पोस्टमध्ये लिहलं आहे. त्यांच्या या पोस्टमुळे सध्या मोठी खबळ उडाली आहे.

तपन मिश्रा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये (Facebook Post) दिलेल्या माहितीनुसार, अनेक बड्या शास्त्रज्ञांचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या बातम्या वारंवार समोर येत असतात. 1971 साली प्राध्यापक विक्रम साराभाई यांचंही संशयास्पद निधन झालं होतं. 1999 मध्ये व्हीएसएससीचे संचालक डॉ. एस. श्रीनिवासन यांच्या मृत्यूवरही प्रश्न उपस्थित झाले होते. इतकेच नाही तर 1994 मध्येही श्री नंबीनारायण यांचाही संशयास्पद मृत्यू झाला होता.

23 मे 2017 चं आहे प्रकरण

फेसबूक पोस्टच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण 23 मे 2017 आहे. यावेळी तपन मिश्रा यांना जीवघेण्या आर्सेनिक ट्राइऑक्साइड (Arsenic Trioxide) देण्यात आलं होतं. हेडक्वार्टर बंगळुरुमध्ये त्यांच्या प्रमोशन इंटरव्ह्यूच्या वेळी चटणी आणि डोसामध्ये त्यांना विष देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यानंतर त्यांना बंगळुरू ते अहमदाबाद प्रवास करताना प्रचंड त्रास झाला. त्यावेळी तपन मिश्रा यांनी Sci/Eng SF ग्रेडने SG ग्रेडसाठी इंटरव्यू दिला होता.

‘श्वास घेण्यासाठी झाला त्रास’

तपन मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादवरून परतत येताना त्यांना खूप त्रास झाला. यावेळी त्यांना अॅनल ब्लीडिंग झाल्याचंही ते म्हणाले. यामुळे शरीरातून 30 ते 40 रक्त कमी झालं होतं. त्यानंतर त्याना जायडल कॅडिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना श्वास घेण्यासाठीही खूप त्रास होत होता. हात आणि पायाची नखंही निघू लागली होती. पण अनेक उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचं तपन मिश्रा यांनी पोस्टद्वारे सांगितलं. (isro scientist shocking fb post tapan mishra claims poisoned)

इतर बातम्या – 

मोठी बातमी: भारतीय हवाई दलाचं MiG-21 विमान क्रॅश, उड्डाण भरताच इंजिनने घेतला पेट

भारतासोबत युद्धाच्या तयारीत आहे ड्रॅगन? LAC वर तैनात केल्या तोफ

(isro scientist shocking fb post tapan mishra claims poisoned)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.