Video: उत्तराखंडच्या चामोलीच्या दुर्घटनेनंतर नेमकं काय घडलं? बघा निसर्गाची ही करणी

| Updated on: Feb 17, 2021 | 10:14 PM

उत्तराखंडमधील चामोलीत हिमकडे वितळून झालेल्या हाहाकारानंतर या ठिकाणी अनोखी घटना पाहायला मिळालीय.

Video: उत्तराखंडच्या चामोलीच्या दुर्घटनेनंतर नेमकं काय घडलं? बघा निसर्गाची ही करणी
Follow us on

देहरादून : उत्तराखंडमधील चामोलीत हिमकडे वितळून झालेल्या हाहाकारानंतर या ठिकाणी अनोखी घटना पाहायला मिळालीय. पूर ओसरल्यानंतर मुरेंडा (Murenda) या ठिकाणी एक नैसर्गिक तलाव तयार झालाय. इंडो तिबेटीयन पोलिसांचं (ITBP) पहिलं पथक या तलावाच्या ठिकाणी पोहचलंय. आयटीबीपीने या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीनंतर निसर्गाच्या करणीतून तयार झालेल्या या तलावाचा व्हिडीओ जारी केलाय. यात संबंधित जवान या तलावाच्या अवतीभोवती दिसत आहेत (ITBP team reached murenda where a natural lake is formed in Chamoli Uttarakhand).

आयटीबीपीच्या जवानांनी या ठिकाणी छावणी तयार केलीय. तसेच मदतीच्या कामाला वेग यावा म्हणून याच ठिकाणी हेलिपॅडचीही जागा निश्चित करण्यात आलीय. लवकरच या ठिकाणी डीआरडीओचं पथकही दाखल होणार आहे. चामोलीतील या तलावाजवळ पोहचलेल्या जवानांनी काढलेल्या या व्हिडीओत पुराच्या विदारक स्थितीनंतरचं काहीसं आल्हाददायक चित्र दिसत आहे. या तलावात निळंशार पाणी दिसत असून ते अगदी सौम्यपणे वाहताना दिसत आहे.

आयटीबीपीच्या जवानांनी या तलावाच्या प्रवाहात अडथळा ठरणारे लाकडं आणि इतर घाणही साफ केली. त्यामुळे या तलावाचं सौदर्य आणखीच वाढलं. खळखळून वाहणारा तलावातील पाण्याचा प्रवाह याआधी झालेल्या प्रलयाच्या विध्वंसाच्या अगदी उलटा आहे.

भूकंप सेन्सर लावण्याचा निर्णय

दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाने उत्तराखंडच्या हिमालय परिसरात भूकंप सेन्सर लावण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी 15 सेन्सर लावण्यात येणार आहेत. आयआयटी रुडकीच्या सहकार्याने हे सेन्सर लावण्यात येणार आहेत. त्यासाठी 45 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी या निधीला मंजुरीही दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव एस ए मुरुगेशन यांननी याबाबतचे जीओ जारी केले आहे.

45 लाखांचा प्रस्ताव 

उत्तराखंडच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आला होता. राज्यात भूकंपाची पूर्व सूचना देणारं तंत्र विकसित करण्यासाठी आयआयटी रुडकीने 15 भूंकप सेन्सर लावले होते. मात्र, सध्या हे सेन्सर खराब झाले आहेत. त्यामुळे संस्थेने शासनाकडे 45 लाखांचा प्रस्ताव पाठवला होता. त्यात निधीचा दुरुपयोग झाला तर आयआयटी रुडकीच्या संचालकांवर त्याची जबाबदारी असेल, असं त्यात नमूद करण्यात आलं होतं.

पुनर्वसनासाठी 51 लाख

चमोली जिल्ह्यातील थराली तालुक्यातील फल्दिया गावातील 12 कुटुंबाला सुरक्षितस्थळी नेऊन त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी 51 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महापुरामुळे या गावाचं अतोनात नुकसान झालं आहे. या गावातील 12 कुटुंबाचं घरदार वाहून गेल्याने त्यांचं पुनर्वसन करण्यात येत आहे. मंजूर करण्यात आलेल्या 51 लाखांमध्ये घर बांधण्यासाठी 4 लाख, गोशाळा निर्माण करण्यासाठी 15 हजार आणि विस्थापन भत्ता 10 हजार रुपये आदींचा समावेश आहे. (Uttarakhand flash floods: 36 bodies recovered, CM approves relocation of families)

हेही वाचा : 

चामोलीत 36 मृतदेह बाहेर काढले, ड्रिलिंगसाठी एक्सावेटर मशीन मागवली; रेस्क्यू ऑपरेशन सुरूच

नि: शब्द ! मालकाच्या शोधासाठी कुत्रा दोन दिवसांपासून तपोवन टनलबाहेर उभा, बचाव पथकाचे जवानही हैराण

70 हजार वनगुज्जर आजही प्रवाहाबाहेरच, उत्तराखंडमध्ये मराठी मुलाच्या प्रयत्नाने शिक्षणाची दारं खुली

व्हिडीओ पाहा :