चामोलीत 36 मृतदेह बाहेर काढले, ड्रिलिंगसाठी एक्सावेटर मशीन मागवली; रेस्क्यू ऑपरेशन सुरूच

धौलीगंगा नदीचा जलस्तर काल गुरुवारी पुन्हा वाढला. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून तपोवन-विष्णुगाड परियोजनेच्या भुयारात अडकलेल्या 25 ते 35 लोकांना बाहेर काढण्यात अडचणी आल्या. (Uttarakhand flash floods: 36 bodies recovered, CM approves relocation of families)

चामोलीत 36 मृतदेह बाहेर काढले, ड्रिलिंगसाठी एक्सावेटर मशीन मागवली; रेस्क्यू ऑपरेशन सुरूच

उत्तराखंड: धौलीगंगा नदीचा जलस्तर काल गुरुवारी पुन्हा वाढला. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून तपोवन-विष्णुगाड परियोजनेच्या भुयारात अडकलेल्या 25 ते 35 लोकांना बाहेर काढण्यात अडचणी आल्या. मात्र, रेस्क्यू ऑपरेशन सुरूच ठेवण्यात आलं. यावेळी दोन मृतदेह सापडल्याने या दुर्घटनेतील मृतांची संख्या 36 वर गेली आहे. तर, अजूनही 168 जण बेपत्ता आहेत. तसेच या भुयारातील ढिगारा हटवण्यासाठी ड्रिलिंगचं काम सुरू करण्यात आलं असून त्यासाठी सर्वात मोठी एक्सावेटर ही मशीन मागवण्यात आली आहे. (Uttarakhand flash floods: 36 bodies recovered, CM approves relocation of families)

या टनेलमधून गाळ काढण्यासाठी सर्वात मोठी एक्सावेटर मशीन आणण्यात आली आहे. या मशीनद्वारे गाळ मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने काढता येतो. एक्सावेटरसह मोठ्या डंपरच्या सहाय्यानेही गाळ काढण्यात येणार आहे. तर, दुसरीकडे चामोली जिल्ह्यातील भुयारात अडकलेल्या लोकांना शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. लष्कर, आयटीबीपी, एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीमकडून हे काम सुरू आहे. काल दुपारी धौलीगंगेचा जलस्तर अचानक वाढल्याने बचावकार्यात गुंतलेल्या सर्व यंत्रणांना बाहेर पडावं लागलं होतं. त्यामुळे काही काळ अफरातफरही निर्माण झाली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला या परिसरात पुन्हा अॅलर्ट जाहीर करावा लागला होता. लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी हा अॅलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, सुदैवाने काही काळाने नदीचा जलस्तर कमी झाला. त्यामुळे पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन हाती घेण्यात आलं.

भूकंप सेन्सर लावण्याचा निर्णय

दुसरीकडे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाने उत्तराखंडच्या हिमालय परिसरात भूकंप सेन्सर लावण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी 15 सेन्सर लावण्यात येणार आहेत. आयआयटी रुडकीच्या सहकार्याने हे सेन्सर लावण्यात येणार आहेत. त्यासाठी 45 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी या निधीला मंजुरीही दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव एस ए मुरुगेशन यांननी याबाबतचे जीओ जारी केले आहे.

45 लाखांचा प्रस्ताव 

उत्तराखंडच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आला होता. राज्यात भूकंपाची पूर्व सूचना देणारं तंत्र विकसित करण्यासाठी आयआयटी रुडकीने 15 भूंकप सेन्सर लावले होते. मात्र, सध्या हे सेन्सर खराब झाले आहेत. त्यामुळे संस्थेने शासनाकडे 45 लाखांचा प्रस्ताव पाठवला होता. त्यात निधीचा दुरुपयोग झाला तर आयआयटी रुडकीच्या संचालकांवर त्याची जबाबदारी असेल, असं त्यात नमूद करण्यात आलं होतं.

पुनर्वसनासाठी 51 लाख

चमोली जिल्ह्यातील थराली तालुक्यातील फल्दिया गावातील 12 कुटुंबाला सुरक्षितस्थळी नेऊन त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी 51 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महापुरामुळे या गावाचं अतोनात नुकसान झालं आहे. या गावातील 12 कुटुंबाचं घरदार वाहून गेल्याने त्यांचं पुनर्वसन करण्यात येत आहे. मंजूर करण्यात आलेल्या 51 लाखांमध्ये घर बांधण्यासाठी 4 लाख, गोशाळा निर्माण करण्यासाठी 15 हजार आणि विस्थापन भत्ता 10 हजार रुपये आदींचा समावेश आहे. (Uttarakhand flash floods: 36 bodies recovered, CM approves relocation of families)

संबंधित बातम्या:

नि: शब्द ! मालकाच्या शोधासाठी कुत्रा दोन दिवसांपासून तपोवन टनलबाहेर उभा, बचाव पथकाचे जवानही हैराण

उत्तराखंडमधील हिमकडा कशामुळे कोसळला?, अमेरिकेच्या संशोधकांचा खळबळजनक दावा

आणि अशा पद्धतीने अहमदाबाद निवडणुकीत काँग्रेस न लढताच तीन जागा गमावल्या !

(Uttarakhand flash floods: 36 bodies recovered, CM approves relocation of families)

Published On - 9:57 am, Fri, 12 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI