दोन मुलांची बार डान्सर आई… स्वतःला विद्यार्थिनी सांगून व्यावसायिकाला अडकवले, थेट हॉटेलमध्ये बोलवून…

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. दोन मुलांची आई आणि बार डान्सर असलेल्या एका महिलेने व्यापाऱ्याची फसवणुक केली आहे. हे प्रकरण समोर येताच अनेकांना धक्का बसला आहे.

दोन मुलांची बार डान्सर आई… स्वतःला विद्यार्थिनी सांगून व्यावसायिकाला अडकवले, थेट हॉटेलमध्ये बोलवून...
Jabalpur
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 21, 2026 | 10:21 AM

जबळपूर शहरात सोशल मीडियाद्वारे सुरू झालेल्या एका मैत्रीचा अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक शेवट समोर आला आहे. जबळपूर पोलिसांनी हनीट्रॅपच्या एका मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश करत एका धूर्त महिलेला व्यापाऱ्याकडून अडीच लाख रुपये वसूल करताना रंगेहाथ पकडले आहे. पकडलेली आरोपी म्हणजे दोन मुलांची आई आणि बार डान्सर पूजा रैदास उमरिया जिल्ह्यातील बिरसिंहपूर पाली येथील रहिवासी आहे. तिने स्वतःला विद्यार्थिनी सांगून गेल्या एक वर्षापासून व्यापाऱ्याला आपल्या जाळ्यात अडकवून लाखो रुपये उकळले होते.

हा प्रकार जबळपूरच्या ग्वारीघाट येथील रहिवासी व्यापारी सार्थक सिंह यांच्याशी संबंधित आहे. एप्रिल २०२५ मध्ये सार्थकची पूजाशी सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती. पूजाने स्वतःला एक साधी-सरळ विद्यार्थिनी सांगितले, तर प्रत्यक्षात ती जबळपूरमधीलच एका बारमध्ये डान्सर म्हणून काम करत होती. सार्थक तिच्या जाळ्यात अडकला आणि तिच्या प्रत्येक मागणीची पूर्तता करू लागला. व्यापाऱ्याने तिला महागड्या गाड्या, मौल्यवान भेटी आणि लाखो रुपयांचे सामान खरेदी करून दिले.

जवळीक वाढताच 20 लाखांची फसवणुक

नाते जसजसे जवळचे होत गेले, तसतसे पूजाचे खरे रूप समोर येऊ लागले. तिने व्यापाऱ्यावर थेट २० लाख रुपये देण्याचा दबाव आणण्यास सुरुवात केली. जेव्हा व्यापाऱ्याने इतकी मोठी रक्कम देण्यास नकार दिला, तेव्हा पूजाने त्याला खोट्या पोलिस केस आणि बलात्काराच्या खटल्यात अडकविण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली. सतत मिळत असलेल्या धमक्यांमुळे त्रस्त होऊन अखेर हा सौदा ७ लाख रुपयांवर ठरला. यानंतर पीडित व्यापाऱ्याने १८ सप्टेंबर रोजी कोतवाली ठाण्यात जाऊन संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली.

हॉटेल कदम ट्रीमध्ये पोलिसांनी रचला सापळा

तक्रार मिळताच कोतवाली पोलिसांनी हनीट्रॅप उघड करण्यासाठी एक गुप्त योजना आखली. पोलिसांच्या निर्देशानुसार सार्थकने पूजाला फोन करून सांगितले की त्याने पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात २.५ लाख रुपये जमवले आहेत. रविवारी दुपारी कोतवाली ठाणे क्षेत्रातील गोपालबाग येथील हॉटेल कदम ट्रीमध्ये भेटीचे ठिकाण निश्चित झाले. खोलीत पूजाने सार्थककडून २.५ लाख रुपयांनी भरलेली बॅग घेतली, तितक्यात सिव्हिल ड्रेसमधील महिला पोलिस कर्मचारी आणि पोलिस पथकांनी तिला वेढा घालून घेरले. बॅगेची तपासणी केल्यावर संपूर्ण अडीच लाख रुपये नगद सापडले.

मोठ्या टोळीची शक्यता

प्रकरणाची माहिती देताना सीएसपी कोतवाली अखिलेश गौर यांनी सांगितले की, पीडित व्यापाऱ्याच्या तक्रारीवर तात्काळ FIR नोंदवून पथक स्थापन करण्यात आले होते आणि महिलेला वसुली करताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. पोलिस आता आरोपी पूजा रैदासचा मोबाइल फोन, सोशल मीडिया अकाउंट्स आणि व्हॉट्सअॅप चॅट्सची छाननी करत आहेत. पोलिसांना संशय आहे की या हनीट्रॅपमागे एखादी मोठी टोळीही काम करत असू शकते, ज्यांनी इतर व्यापाऱ्यांनाही लक्ष्य केले असेल. सध्या आरोपी महिलेविरुद्ध रंगदारी/वसुलीच्या कलमांखाली खटला दाखल करून कारवाई सुरू आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us