Farooq Abdullah : काश्मीरमध्ये सत्ता येणार दिसू लागताच फारुक अब्दुल्लाह आर्टिकल 370 वरुन नको ते बरळले

Farooq Abdullah : जम्मू-काश्मीरचा पुढचा मुख्यमंत्री कोण? हे फारुक अब्दुल्लाह यांनी जाहीर केलय. जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता येणार हे दिसू लागताच फारुक अब्दुल्लाह आर्टिकल 370 च्या मुद्यावरुन नको ते बरळले आहेत.

Farooq Abdullah : काश्मीरमध्ये सत्ता येणार दिसू लागताच फारुक अब्दुल्लाह आर्टिकल 370 वरुन नको ते बरळले
Farooq Abdullah
| Updated on: Oct 08, 2024 | 3:04 PM

आज दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. हरियाणा आणि जम्मू-काश्मीर. यात जम्मू-काश्मीरच्या निकालाकडे सगळ्या देशाच लक्ष आहे. कारण आर्टिकल 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक होत आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेमध्ये एकूण 90 जागा आहे. बहुमताचा आकडा 46 आहे. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने या निवडणुकीसाठी आघाडी केली होती. भाजपा आणि पीडीपी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. सध्या आकडेवारीनुसार काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सकडे 47 जागांची आघाडी आहे. भाजपाकडे 29, पीडीपी 4 आणि इतर पक्षांकडे 8 जागांची आघाडी आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सच सरकार येण्याची चिन्ह दिसू लागताच NC चे प्रमुख फारुक अब्दुल्लाह आर्टिकल 370 हटवण्यावरुन नको ते बरळले. “लोकांनी त्यांचा कौल दिला आहे. 5 ऑगस्टला घेतलेला निर्णय मान्य नाही, हे लोकांनी आपल्या निर्णयातून सिद्ध केलय. ओमर अब्दुल्लाह पुढचे मुख्यमंत्री होतील” असं फारुक अब्दुल्लाह म्हणाले. 5 ऑगस्टला 2019 ला भारत सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याच दर्जा देणारं आर्टिकल 370 रद्द केलं होतं.


‘हिंदू-मुस्लिमांमध्ये आम्ही…’

“दहा वर्षानंतर लोकांनी त्यांचा कौल दिला. लोकांच्या अपेक्षा आमच्याकडून पूर्ण होवोत अशी मी अल्लाहकडे प्रार्थना करीन. येणाऱ्या सरकारमध्ये पोलीस राज नसेल, लोकांच राज असेल. जेलमध्ये असलेल्या निरपराध लोकांना बाहेर काढू. मीडियाला स्वातंत्र्य मिळेल. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये विश्वासाचा पूल बांधण्याच काम करु” असं फारूक अब्दुल्लाह म्हणाले.