Jammu Kashmir : दहशतवाद्यांचा घरात घुसून गोळीबार, माजी SPO सह पत्नी आणि मुलीची हत्या

| Updated on: Jun 28, 2021 | 11:46 AM

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी (Jammu Kashmir terrorist attack) घरात घुसून केलेल्या गोळीबार करुन, माजी SPO फैयाज अहमद  (SPO Fayaz Ahmad ) आणि त्यांच्या पत्नीची हत्या केली.

Jammu Kashmir : दहशतवाद्यांचा घरात घुसून गोळीबार, माजी SPO सह पत्नी आणि मुलीची हत्या
Jammu Kashmir security forces
Follow us on

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी (Jammu Kashmir terrorist attack) घरात घुसून केलेल्या गोळीबार करुन, माजी SPO फैयाज अहमद  (SPO Fayaz Ahmad ) आणि त्यांच्या पत्नीची हत्या केली. या गोळीबारात माजी पोलीस अधिकारी अहमद यांची मुलगीही गंभीर जखमी झाली होती. तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे अतिरेक्यांच्या गोळीबारात झालेल्या मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे. रात्री 11 च्या सुमारास हा गोळीबार झाला. या गंभीर हल्ल्यानंतर सुरक्षारक्षकांनी (jammu Kashmir Police) परिसराला घेराव घालून, सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. (Jammu Kashmir terrorist attack militants shoot dead SPO Fayaz Ahmad, his wife and daughter in Awantipora)

काश्मीर पोलिसांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. दहशतवादी अवंतीपुरा (Awantipora Attack) भागातील हरिपरिगावात घुसले. त्यांनी SPO फयाज अहमद यांच्या घरात शिरुन अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये अहमद यांची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र आधी पत्नी आणि नंतर मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कुटुंबातील तिघांचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यानंतर तिन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे माजी SPO फैयाज अहमद यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलीचाही मृत्यू झाला. त्यामुळे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.यामध्ये अहमद यांची पत्नी राजा बानो (48) आणि मुलगी राफिया जान (25) यांचा समावेश आहे. राफिया जानची प्रकृती अत्यंत गंभीर होती, त्यामुळे तिच्यावर श्रीनगर इथल्या रुग्णालयात उपचार सुरु होते.

दहशतवादी हल्ला

यापूर्वी रविवारीही जम्म विमानतळावरील एअरफोर्स स्टेशनवर स्फोटकांनी भरलेले दोन ड्रोन पाडले होते. त्यावेळी 6 मिनिटांच्या अंतराने दोन स्फोट झाले होते. यामध्ये वायूदलाचे दोन जवान जखमी झाले होते. हा सुद्धा दहशतवादी हल्लाच असल्याचं जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितलं होतं. पोलीस, वायूदल आणि अन्य सुरक्षा यंत्रणा या हल्ल्याचा तपास करत आहेत.

संबंधित बातम्या 

Jammu Blast: जम्मू एअरफोर्स स्टेशनवर हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर? एअर मार्शल दौऱ्यावर, NSG, NIA टीमही दाखल

गुपकार नेत्यांकडून मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह ‘या’ 5 मागण्या