NARENDRA MODI कडून जपानच्या पंतप्रधानांना चंदनाच्या लाकडाचा ‘कृष्णपंख’ भेट, जाणून घ्या कृष्ण पंखाची खासियत ?

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Japanese Prime Minister Fumio Kishida) सध्या भारत दौऱ्यावरती आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi)  यांनी 'कृष्ण पंख' भेट दिला आहे.

NARENDRA MODI कडून जपानच्या पंतप्रधानांना चंदनाच्या लाकडाचा कृष्णपंख भेट, जाणून घ्या कृष्ण पंखाची खासियत  ?
NARENDRA MODI नी जपानच्या पंतप्रधानांना चंदनाच्या लाकडाचा 'कृष्णपंख' भेट दिला
Image Credit source: twitter
| Updated on: Mar 20, 2022 | 2:33 PM

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Japanese Prime Minister Fumio Kishida) सध्या भारत दौऱ्यावरती आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi)  यांनी ‘कृष्ण पंख’ भेट दिला आहे. हा कृष्ण पंखी चंदनाच्या लाकडापासून तयार करण्यात आला आहे. हा कृष्ण पंख राजस्थानच्या एका कारागिराने प्रचंड मेहनतीने तयार केला असून तो पारंपरिक पद्धतीने बनवला आहे. तो दिसायला अतिशय देखणा असून त्यांच्यावरती लोकांना आवडेल असं नक्षीकाम (Carving) करण्यात आलं आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांना मोदींकडून ही खास भेट देण्यात आली आहे.

कृष्ण पंखाची खासियत तुम्हाला माहित आहे का ?

अतिशय देखणा दिसत असलेला कृष्ण पंख पारंपारिक पद्धतीने तयार करण्यात आला आहे. कृष्ण पंखाच्या वरच्या बाजूला भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर तयार करण्यात आला आहे. कृष्ण पंखाचं काम पुर्णपणे हाताने करण्यात आल्याने त्यावर एकप्रकारची वेगळी चमक दिसत आहे. तसेच त्यामध्ये करुणेचे प्रतीक असलेल्या कलात्मक आकृत्यांमधून भगवान श्रीकृष्णाची विविध मुद्रा सुध्दा दिसत आहे. कृष्ण पंख पारंपारिक साधनांनी बारीक कोरण्यात आली आहे. त्याच्या बाजूला एक लहान ‘घुंगरू’ (लहान पारंपारिक घंटा) आहे. ती हवेच्या प्रवाहाने वाजते आणि आतमध्ये चार लपलेल्या खिडक्या देखील आहेत. त्यामुळे भेट दिलेल्या कृष्ण पंखाची अधिक चर्चा आहे.

कुशल कारागिरांनी तयार केला कुष्ण पंख

कृष्ण पंख तयार करण्याचं काम राजस्‍थानच्‍या चुरूमध्‍ये कुशल कारागिरांनी केले आहे.त्यांनी याआधीच चंदनाची कलाकृती एक सुंदर आणि मोहक कलाकृती बनवली आहे. चंदन हे त्याच्या मोहक सुगंधासाठी ओळखले जाते. शतकानुशतके चंदनाला मौल्यवान आणि पवित्र मानले जाते, तसेच त्याला धार्मिक महत्त्वही आहे.

एमआयएम ही भाजपची बी टीमच, आघाडी नाहीच, CM Uddhav Thackeray यांनी एमआयएमचा प्रस्ताव धुडकावला

Raut on MIM: खरी जनाब सेना कोण, हे महाराष्ट्राला सांगणार; भाजपचा कट उधळला, राऊतांचा घणाघात

Extortion case : अंगडिया खंडणी प्रकरण, सौरभ त्रिपाठींच्या शोधासाठी पाच पथके, उत्तर प्रदेशसह, मध्य प्रदेशात पथकाकडून शोध सुरू