‘जीवन उत्कर्ष महोत्सव’ च्या शुभारंभाप्रसंगी सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रेरणादायी शब्द

या प्रसंगी पुस्तकाचे लेखक विद्वान संत महा महोपाध्याय भद्रेशदास स्वामीजी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आबूधाबी येथील हिंदू मंदिराचे संचालक संत ब्रह्मबिहारी स्वामी यांनी सुद्धा संबोधित केलं.

जीवन उत्कर्ष महोत्सव च्या शुभारंभाप्रसंगी सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रेरणादायी शब्द
Jeevan Utkarsh Mahotsav
| Updated on: Nov 04, 2025 | 2:35 PM

बीएपीएस श्री स्वामिनारायण संस्थेद्वारे आयोजित पाच दिवसीय “जीवन उत्कर्ष महोत्सव” चा भव्य शुभारंभ आज जबलपुरच्या हॉटल विजन महल येथे झाला. मंडला रोड तिलहरी येथे हे हॉटेल आहे. अत्यंत भक्तीभाव आणि उत्साहाने या महोत्सवाची सुरुवात झालीय. परम पूज्य महंत स्वामी महाराज यांच्या पवित्र जन्मस्थानी हे आयोजन होत आहे. जबलपुरसाठी हा ऐतिहासिक आणि गौरवपूर्ण क्षण आहे. प्रातःकालीन सत्रात पूज्य आदर्शजीवन स्वामीद्वारे “महंत चरितम” विषयावर प्रेरणादायक पारायण संपन्न झालं. देश-विदेशातील शेकडो श्रोते यामध्ये सहभागी झाले होते. परम पूज्य महंत स्वामी महाराजांच्या आदर्श जीवनातून आत्मिक प्रेरणा मिळाली. परम पूज्य महंत स्वामी महाराज बीएपीएस संस्थेचे विद्यमान आध्यात्मिक गुरु आहेत. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन सेवा, साधना, सत्संग आणि संस्कार प्रसारासाठी समर्पित केलय. त्यांचं जीवन विनम्रता, समता आणि प्रेम यांचं जिवंत उदाहरण आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जगभरात शेकडो मंदिरं आणि सामाजिक सेवा प्रकल्पांद्वारे समाज उत्कर्षाच्या दिशेने उल्लेखनीय कार्य झालं आहे.

या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत प्रमुख पाहुणे होते. बीएपीएस संतांनी त्यांचं हार, अंगवस्त्र आणि पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केलं. भागवत यांनी संबोधित करताना महंत स्वामी महाराजांच्या जीवनातून मिळालेली प्रेरणा आणि राष्ट्र निर्माणासाठी आध्यात्मिकता योगदानावर प्रकाश टाकला. विश्ववंदनीय संत प्रमुख स्वामी महाराजांच्या जीवनावर साहित्य अकादमी द्वारा प्रकाशित पुस्तक ‘संत विभूति प्रमुख स्वामी महाराज’ याचं लोकार्पण झालं. या प्रसंगी पुस्तकाचे लेखक विद्वान संत महा महोपाध्याय भद्रेशदास स्वामीजी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आबूधाबी येथील हिंदू मंदिराचे संचालक संत ब्रह्मबिहारी स्वामी यांनी सुद्धा संबोधित केलं.

मुख्यमंत्री सहभागी होणार

BAPS संस्थेच्या विश्वव्यापी सेवा प्रवृत्तीचे संयोजक वरिष्ठ संत ईश्वरचरण स्वामीजी यांनी आशीर्वाद दिला. त्याचवेळी जबलपुरच्या भूमीच महत्व सांगितलं. या उत्सवात 4 नोव्हेंबरला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव सहभागी होणार आहेत. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अन्य वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. बीएपीएसच्या संतांनी मनोहर कीर्तन-भजन, प्रेरणादायक प्रवचनांनी वातावरण भक्तीमय बनवलं. कार्यक्रमात जबलपुर आणि आसपासच्या क्षेत्रातील हजारो हरिभक्त सहभागी झाले होते. पहिल्या दिवसाचं आयोजन अत्यंत सफल आणि प्रेरणादायी होतं. पुढच्या चार दिवसांसाठी त्यामुळे श्रद्धा आणि उत्साहाचं पवित्र वातावरण निर्माण झालं. जबलपुरचा हा “जीवन उत्कर्ष महोत्सव” केवल एक आध्यात्मिक आयोजन नाही, तर महंत स्वामी महाराजांचा जीवन-संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक पुण्य प्रयत्न आहे.