दोन जोडपे, चार मृत्यू… लग्न, प्रेम आणि … एकाच दिवसात भयंकर घडलं

झारखंडमध्ये एकाच दिवशी दोन हृदयद्रावक घटना घडल्या. लोहरदगा येथे नवविवाहित जोडप्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला, तर जामताडा येथे प्रेमी जोडप्याचा मृतदेह रेल्वे रुळांवर आढळला. या दोन्ही घटनांमध्ये एकूण चार जणांचा मृत्यू झाला. प्रेमसंबंधांना कुटुंबीयांचा विरोध आणि मानसिक तणाव ही या दुर्दैवी घटनांमागील प्रमुख कारणे असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे, ज्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

दोन जोडपे, चार मृत्यू... लग्न, प्रेम आणि ... एकाच दिवसात भयंकर घडलं
crime scene
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 26, 2026 | 1:59 PM

झारखंडसाठी शनिवारचा दिवस अत्यंत वाईट ठरला आहे. राज्यात दोन भयानक दुर्घटना घडल्या आहेत. लोहरदगामध्ये नुकतंच लग्न झालेल्या एका जोडप्याचा मृत्यू झाला आहे. तर जामताडामध्ये एका प्रेमी जोडप्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला आहे. प्राथमिक तपासात या दोन्ही घटनांमागची कारणं वेगवेगळी असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पहिली घटना लोहरदगाच्या भंडारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनामुंजी गावात घडली आहे. अजित उरांव या 25 वर्षीय व्यक्तीचा आणि बाल्मिकी उरांव या 20 वर्षीय तरुणीचा जळून मृत्यू झाला आहे. दोघांचं नुकतंच लग्न झालं होतं. पोलिसांच्या मते, शनिवारी घरातील लोकांना घरात मोठी आग लागलेली दिसली. दरवाजा आतून बंद होता. कुटुंबीयांनी लगेचच दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि दोन्ही पती-पत्नीला बाहेर काढलं. त्यांना लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Loading...

या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण अजित यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्याच्या पत्नीची परिस्थिती नाजूक असल्याने तिला रांचीच्या आरआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. मानसिक तणावामुळे या दोघांनी जाळून घेतल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

लग्नाला विरोध अन्…

दुसरी घटना जामताडा येथील करमाटांड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. रिंगोचिंगो गावातली 20 वर्षाचा रॉकी कुमार मंडल आणि नाजिया खातून यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला. पोलिसांच्या मते, शुक्रवारी रात्री जत्रा पाहून आल्यावर दोघे घराकडे येत होते. त्यानंतर ते मंदिरातही गेले. रॉकीच्या मोबाइलमध्ये दोघांचे फोटो सापडले आहेत. दोघेही 2024 पासून रिलेशनशीपमध्ये होते, असं पोलिसांचं म्हणणं आहे. या दोघांनी स्वत:हून जीवन संपवलं असं पोलिसांचं म्हणणं आहे. दोन्ही कुटुंबाकडून लग्नाला विरोध होता. त्यामुळेच या दोघांनी टोकाचा निर्णय घेतला असावा, असं सांगितलं जात आहे. या दोघांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आले आहेत.

प्रश्न कायम…

दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी झाली आहे. दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध नाही. पण दोन्ही गोष्टीमागे नातेसंबंध आणि तणाव असल्याचं सांगितलं जात आहे. लोहरदगा पोलिसांनी मानसिक तणावाची शक्यता वर्तवली आहे. तर जामताडा पोलिसांनी कुटुंब लग्नाला तयार नव्हतं म्हणून या दोघांनी टोकाचा निर्णय घेतल्याचा निष्कर्ष काढला आहे. दरम्यान, पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us