जिओकडून ग्राहकांना 6 महिने इंटरनेट अन् कॉलिंग सुविधा फ्री, कंपनीची मोठी घोषणा, प्लॅन कसा अॅक्टिव्ह करायचा?
जीओकडून आपल्या दहाव्या वर्धापण दिनानिमित्त मोठी घोषणा करण्यात आली आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये आहे. सहा महिने डेटा अन् कॉलिंग सुविधा अगदी मोफत मिळणार आहे.

आपल्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी घोषणा केली आहे. या ऑफरचं वैशिष्ट म्हणजे ग्राहकांना दर महिन्याला 14GB डेडा आणि एचडी व्हॉइस कॉलिंगची सुविधा सहा महिन्यांपर्यंत अगदी मोफत मिळणार आहे. याचाच अर्थ सहा महिन्यांमध्ये कंपनीकडून आपल्या ग्राहकांना एकूण 84GB जीबी डेटा मोफत दिला जाणार आहे. तसेच सहा महिने फ्री कॉलिंग देखील मिळणार आहे. मात्र या फायद्यांसोबत कंपनीच्या काही अटी आणि नियम देखील असणार आहेत. ऐन सणासुदीच्या काळात जीओ कंपनीकडून ही घोषणा करण्यात आल्यानं त्याचा ग्राहकांना मोठा लाभ होणार आहे. आपल्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त रिलायन्स जीओकडून हा खास प्लॅन अॅक्टिव्ह करण्यात आल आहे.
ही सुविधा रिलायन्स जिओने आपल्या ‘जिओभारत’ (JioBharat) फोन वापरकर्त्यांसाठीच लागू केली आहे. या प्लॅनचा फायदा हा विशेषतः अशा वापरकर्त्यांना होणार आहे, जे अजूनही 2G फीचर असलेला फोन वापरत आहेत, पंरतु त्यांना आता 4G नेटवर्कमध्ये अपग्रेड व्हायचं आहे . रिलायन्स जिओने आपल्या ‘जिओभारत’ फोन वापरकर्त्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या योजनेंतर्गतं निवडक ठिकाणी ‘जिओभारत’ 4G फोन उपलब्ध आहेत, ज्याची किंमत 1499 रुपये एवढी असून, हा फोन खरेदी केल्यानंतर पहिले सहा महिने तुम्हाला या फोनवर फ्रि इंटरनेट आणि कॉलिंग सुविधा उपलब्ध असणार आहे.
काय आहे या फोनंच वैशिष्ट
जीओभारत हा जरी दिसायला साध्या बेसिक हॅडसेट सारखा वाटत असला तरी देखील हा फोन या फोनपेक्षा वेगळा आहे. या फोनमध्ये ग्राहकांना फोर जी कनेक्टिव्हिटी मिळते. इटंरनेट वापरता येतं. ज्या ग्राहकांना अत्याधुनिक टचस्क्रिनचे फोन वापरण्यास अडचण येते, अशा ग्राहकांसाठी हा फोन फायद्याचा आहे. हा फोन एकदा खरेदी केल्यानंतर तुम्हाला पहिले सहा महिने सर्व सुविधा फ्रि मिळणार आहेत. यामुळे ग्राहकांची मोठी बचत होऊ शकते. पहिले सहा महिने कोणतंही रिचार्ज करण्याची गरज नाहीये. कंपनीकडून फ्रि सुविधा दिल्या जाणार आहेत.