Kandahar Hijack: ज्यांच्यासाठी विमानाचे अपहरण झाल होते ते दहशतवादी आता कुठे आहेत?

1999 मध्ये घडलेली कंधार विमान अपहरणाची घटना आजही अनेकांच्या स्मरणात आहे. IC 814 The Kandahar Hijack ही वेबसिरीज नुकतीच रिलीज झाल्यानंतर ती घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सुमारे 25 वर्षांपूर्वी अपहरणाच्या बदल्यात तीन दहशतवादी दहशतवाद्यांना सोडण्यात आले होते. सुटका झाल्यानंतर या दहशतवाद्यांनी भारताला अनेक जखमा दिल्या आहेत.

Kandahar Hijack: ज्यांच्यासाठी विमानाचे अपहरण झाल होते ते दहशतवादी आता कुठे आहेत?
| Updated on: Sep 06, 2024 | 8:06 PM

OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज झालेली IC 814: The Kandahar Hijack ही वेब सिरीज सध्या वादात अडकली आहे. कारण सीरिजमध्ये ठेवण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या सांकेतिक नावांवरून वाद झाला होता. नेटफ्लिक्सलाही याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले. मात्र, या वेब सीरीजवरुन अनेकांना कंधार विमान हायजॅकच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. सुमारे 25 वर्षांपूर्वी कंदहार विमान अपहरणाच्या बदल्यात, भारत सरकारने तीन भयानक दहशतवाद्यांची सुटका केली होती. ज्यामध्ये मसूद अझहर, मुश्ताक जरगर आणि उमर शेख यांचा समावेश होता. पण आज हे दहशतवादी कुठे आहेत आणि काय करतात ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मसूद अझहर

या तीन दहशतवाद्यांमध्ये मसूद अझहर हा सर्वात मोठा दहशतवादी आहे. मसूद अझहर आता जम्मूच्या भलवल तुरुंगात बंद आहे. एअर इंडियाचे विमान अपहरण करणाऱ्या दहशतवाद्यांनी मसूदच्या सुटकेची मागणी केली होती. मसूदने जैश-ए-मोहम्मद ही संघटना पुन्हा स्थापन केली. भारतात त्याने अनेक हल्ले केले. भारतीय संसद, मुंबई आणि पठाणकोट एअरबेसवर झालेल्या हल्ल्यांमध्ये मसूदचा हात होता. एवढेच नाही तर पुलवामा हल्ल्यातही त्याचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाले आहेत. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० हून अधिक जवान शहीद झाले होते. अलीकडेच त्यांच्या मृत्यूची अफवाही पसरली होती.

मुश्ताक अहमद जरगर

जरगरला 15 मे 1992 रोजी अटक करण्यात आली होती. कंधार विमान अपहरणानंतर मसूद अझहर आणि शेख उमर यांच्यासह त्याची सुटका करण्यात आली होती. मुश्ताक जरगर हा दहशतवाद्यांचा कमांडर होता. जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी तो पाकिस्तानातून दहशतवादी संघटना चालवत आहे. काश्मीर खोऱ्यातील अनेक दहशतवादी गटांसाठी त्याने लोकांची भरतीही केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार जरगर सध्या पाकिस्तानात राहतो.

उमर शेख

उमर शेख म्हणजेच अहमद उमर सईद शेख हा पाकिस्तानी वंशाचा ब्रिटिश दहशतवादी आहे. 2002 मध्ये सईद शेखने वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार डॅनियल पर्ल यांचे पाकिस्तानात अपहरण करून त्यांची हत्या केली होती. न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती, मात्र वर्षांनंतर सिंध उच्च न्यायालयाने त्याला फाशीच्या शिक्षेतून मुक्त केले आहे. तो अजूनही जिवंत असल्याचे सांगितले जाते.