Kanhaiya Kumar : बिहार काँग्रेसची कमान कन्हैया कुमार यांच्याकडे? अध्यक्षपदाच्या रेसमध्ये कोण कोण?

| Updated on: Apr 17, 2022 | 6:35 PM

बिहार प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मदन मोहन झा (Madan Mohan Jha) यांच्या राजीनाम्यानंतर नव्या अध्यक्षाबाबत चाचपणी सुरू झाली आहे. कन्हैया कुमार यांचं नाव चर्चेत आहे हे कळताच काँग्रेसचे जुने वर्षानुवर्षे पक्षात असणारे नेतेही अस्वस्थ झाले आहेत.

Kanhaiya Kumar : बिहार काँग्रेसची कमान कन्हैया कुमार यांच्याकडे? अध्यक्षपदाच्या रेसमध्ये कोण कोण?
बिहार काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी कन्हैया कुमार यांचं नाव चर्चेत
Image Credit source: tv9
Follow us on

बिहार : गेल्या काही दिवसांत काँग्रेसमध्ये (Bihar Congress) मोठी पडझड झाली आहे. नुकत्यात पाच राज्याच्या निवडणुका पार पडल्या यातही काँग्रेसच्या हाती काही लागलं नाही. उलट पंजाबमधील सत्ताही गेली. बिहार काँग्रेसची अवस्थाही काहीशी तशीच आहे. बिहारमध्ये राजकीय संकटातून जात असलेल्या काँग्रेसला पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बिहार प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मदन मोहन झा (Madan Mohan Jha) यांच्या राजीनाम्यानंतर नव्या अध्यक्षाबाबत चाचपणी सुरू झाली आहे. कन्हैया कुमार यांचं नाव चर्चेत आहे हे कळताच काँग्रेसचे जुने वर्षानुवर्षे पक्षात असणारे नेतेही अस्वस्थ झाले आहेत. कारण आता बिहार काँग्रेसची कमान कन्हैया कुमार यांच्या (Kanhaiya Kumar) हातात जाऊ शकते, असे मानले जात आहे. बिहारमध्ये राजद आणि काँग्रेसचेही पार काही पडलेलं दिसत नाहीये. याचे एक कारण कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये सामील होत असल्याचेही सांगितले जात आहे. राहुल गांधींनी निर्णय घेतल्यास कन्हैया कुमार हे बिहार काँग्रेसचे अध्यक्ष होईतील असे भाकीत राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

कन्हैया अध्यक्ष झाल्यास काय फायदा?

बिहारच्या राजकीय पंडितांच्या मते कन्हैया हे भूमिहार समाजातून आहेत. बिहारमध्ये काँग्रेसला भाजपला आव्हान द्यायचे असेल, तर कन्हैया कुमारशिवाय पक्षाकडे पर्याय नाही. कन्हैयाच्या कुमार यांच्या एन्ट्रीने सध्या भाजपच्या दरबारात असलेले बिहारमधील भूमिहार तरुण काँग्रेसमध्ये येऊ शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे. कन्हैया कुमार हे बिहार काँग्रेसचा अध्यक्ष असतील की नाही यावर काँग्रेस नेत्यांच्या मात्र कोणत्याही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, बिहार काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आणखी अनेक जण पुढे आहेत.

अध्यक्षपदासाठी चर्चेतली नावं

सदाकत आश्रमांचे नावही चर्चेत आहे. यासोबतच मागासवर्गीय समाजातून असलेल्या मीरा कुमार यांचेही नाव बिहार प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत पुढे मानले जात आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय नेत्यांमध्ये तारिक अन्वर, आमदार राजेश कुमार आणि विधिमंडळ पक्षाचे माजी नेते अशोक राम यांचीही नावे घेतली जात आहेत. मुस्लिम समाजाबद्दल बोलायचे झाले तर शकील अहमद खान यांचे नाव आघाडीवर आहे. शकील खान हे सध्या पक्षाचे आमदार आहेत. आता राहुल गांधी आणि बिहार काँग्रेस काय निर्णय घेणार, आणि कन्हैया कुमार बिहार काँग्रेसला नवसंजीवनी देणार का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Sadabhau Khot : चंद्रकांत पाटलांना अनेकांचा हिमालयात जाण्याचा सल्ला; आता सदाभाऊंनी पवारांनाही करुन दिली एका वक्तव्याची आठवण!

महाविकास आघाडीचा रायगडातील पहिला बळी, सुरेश लाड यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीत संभ्रमावस्था

Video : हलगीच्या तालावर खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा ठेका, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल