महाविकास आघाडीचा रायगडातील पहिला बळी, सुरेश लाड यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीत संभ्रमावस्था

महाविकास आघाडीचा रायगडातील पहिला बळी, सुरेश लाड यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीत संभ्रमावस्था
माजी आमदार सुरेश लाड
Image Credit source: TV9

रायगड : राष्ट्रवादी (NCP) जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेश लाड (Former MLA Suresh Lad) यांनी गेल्या 4 महिन्यात दोनदा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत खळबळ उडवून दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) रायगड जिल्हा दौऱ्यावर असताना सुरेश लाड यांनी मिडीयाला बोलावून आपण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहोत असं जाहीर केलं होतं. आणि […]

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

May 13, 2022 | 7:28 PM

रायगड : राष्ट्रवादी (NCP) जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेश लाड (Former MLA Suresh Lad) यांनी गेल्या 4 महिन्यात दोनदा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत खळबळ उडवून दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) रायगड जिल्हा दौऱ्यावर असताना सुरेश लाड यांनी मिडीयाला बोलावून आपण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहोत असं जाहीर केलं होतं. आणि रायगड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी सुरेश लाड यांच्या नाकदुऱ्या काढून समजूत घातली. तसेच सुरेश लाड यांना राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या महामंडळात अध्यक्षपदाचा पहिला मान असेल अस जाहीर केलं होतं. त्यामुळे सुरेश लाड यांनी चार दिवसांत आपला राजीनामा मागे घेतला. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील रायगड जिल्हा दौऱ्यावर असताना पुन्हा सुरेश लाड यांनी राजीनामा देऊन पुनः खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे सध्या महाविकास आघाडीचा रायगडातील पहिला बळी म्हणून सुरेश लाड यांच्या राजीनाम्याकडे पाहिलं जातं आहे.

राजीनाम्याची अनेक कारणे

राज्यात महाविकस आघाडी असली तरी रायगडात राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून विस्तव जात नाही. हे सर्वश्रुत आहेच. पण आघाडी धर्म असताना शिवसेनेचे नवखे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी सुरेश लाड यांचा दणदणीत पराभव केला. आणि त्याच महेंद्र थोरवे यांच्या घरी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पालकमंत्री आदिती तटकरे गेल्या आणि आदरातिथ्य घेतलं. हे शल्य सुरेश लाड यांना अधिकच बोचलं. खालापूरच्या एका कार्यक्रमात महेंद्र थोरवे यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांना विकासकामात अडथळा आणत असताना ‘मांजर आडवी गेली’ अशा शब्दात बोलले होते. त्याच थोरवेंच्या घरी जाऊन आदरातिथ्य घेतल्याचा रागही लाड यांच्या मनात खदखदत होता. जिल्हाध्यक्ष असताना खालापूर नगरंचायतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची झालेली आघाडी ती ही सुरेश लाड यांना अंधारात ठेवून केली गेली. मग काय तो ही गुस्सा लाड यांना होताच. खोपोली नगरपालिकेतील काही राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांनी सुरेश लाड यांना शिकवलेली अक्कल या सर्व गोष्टी आणि यासर्वांवर पक्षश्रेष्ठीनी केलेली डोळेझाक यासर्व गोष्टी लाडांच्या जिव्हारी बसल्या. तशात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या चार महिने आधीच त्यांनी राजीनामा दिला होता. मात्र तो मागे ही घेतला होता. त्यानंतर अनेक अशा घडामोडी घडल्या ज्यामुळे त्यांचा अपमानच होत गेला.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत ही व्यासपीठावर अदिती तटकरे यांनी या खुर्चीवरून उठा त्या खुर्चीवर बसा म्हटल्याने त्यांना अपमान सहन झाला नाही आणि ते थेट नॉट रिचेबल झाले. ते 4थ्या दिवशी घरी परतले. त्यानंतर आपण राजीनामा दिला असे म्हटले होते. मात्र त्याच दिवशी राजीनामा त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे पाठवला होता. तर राष्ट्रवादीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधूनही ते लेफ्ट झाले होते. कॅमेऱ्यासमोर त्यांनी बोलण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. दरम्यान पडद्यामागे बऱ्याच घटना घडत आहेत. मात्र त्यांना आता राष्ट्रवादी परिवारात राहायचं नाही असं त्यांनी त्यांच्या समर्थकांकडून तटकरे यांना निरोप दिला आहे. त्याचबरोबर महामंडळ देखील नको असल्याचे त्यांनी कळवल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी टीव्ही नाईनला दिली आहे. मग आता सुरेश लाड जाणार कुठल्या पक्षात अशा जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. त्यांना फक्त भाजपचा पर्याय असल्याचे बोलले जात आहे. त्यांची भाजप सोबत प्राथमिक चर्चा झाल्याची चर्चा आता जोरदार रंगू लागल्या आहेत. मात्र लाड यांनी या शक्यतेचा स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. ही राजकीय आत्महत्या आहे का असाही प्रश्न त्यांना विचारणयात आला तर ते तस नसल्याचे सांगत आहेत. तर येत्या दोन दिवसात समर्थकांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे

कोण आहेत सुरेश लाड?

सुरेश लाड हे कर्जत विधानसभेवर सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत. चौथ्यांदा उभे राहिले असताना राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी पक्ष विरोधी कारवाई करत त्यांना पराभूत केले. यात बड्या बड्या नेत्यांचा समावेश असल्याची धारणा आहे. मात्र त्यांच्या पराभवानंतर एकाकी पडलेले सुरेश लाड यांचे पुनर्वसन करावं अशी टूम समर्थकांनी तटकरे यांच्याकडे लावली. शेकाप नेत्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी सरकारला दिली आणि सुनील तटकरे यांना पालकमंत्री पदावरून हटवलं. त्यावेळी सुरेश लाड आमदार होते. शेकापने तटकरे यांना हटवून सुरेश लाड यांना मंत्री करून रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री बनवा अशी मागणी केली. मात्र तटकरे नाहीत तर मी पण मंत्री होणार नाही अशी भूमिका सुरेश लाड यांनी घेतली. लाडांचा पराभव झाल्यानंतर त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी तत्कालीन रायगड जिल्हाध्यक्ष दत्ता मसुरकर यांना हटवून सुरेश लाड यांना राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बनवण्यात आलं होतं. मात्र एकवर्ष पूर्ण व्हायच्या आत त्यांनी दोनदा राजीनामा देत त्यांची घुसमट बाहेर काढली आहे. मात्र ते कुठल्या पक्षात जाणार हे आता दोन दिवसानंतर स्पष्ट होईल.

इतर बातम्या :

Kolhapur North Election Result : “राज्यातही महाविकास आघाडीचा कोल्हापूर पॅटर्न चालणार”, उदय सामंत यांचा चंद्रकांत पाटील यांनाही चिमटा

Devendra Fadnavis : दिल्ली प्रमाणे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा डाव, राऊतांचा आरोप; राज ठाकरेंपाठोपाठ फडणवीसही म्हणाले…

Kolhapur Suicide : कोल्हापुरात महिला कॉन्स्टेबलची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें