Menstrual Leave : आता महिलांना मासिक पाळीला मिळणार भरपगारी रजा, असा निर्णय घेणारं हे ठरलं देशातलं पहिलं राज्य

Menstrual Leave : भारतातील एका राज्य सरकारने महिलांना दिलासा देणारा चांगला निर्णय घेतला आहे. महिलांना मासिक पाळीसाठी भरपगारी रजा मिळणार आहे. सरकारी आदेशानुसार, दर महिन्यातील एक दिवस मासिक पाळीसाठी सुट्टी घेता येईल.

Menstrual Leave : आता महिलांना मासिक पाळीला मिळणार भरपगारी रजा, असा निर्णय घेणारं हे ठरलं देशातलं पहिलं राज्य
Menstrual Leave
| Updated on: Nov 13, 2025 | 5:22 PM

भारतातील एका राज्य सरकारने महिलांबाबत एक चांगला, मोठा निर्णय घेतला आहे.कर्नाटक मंत्रिमंडळाने ऑक्टोंबर महिन्यात कार्यरत असलेल्या महिलांना महिन्याच्या वेतनासह पीरियड लीव प्रदान करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली. सरकारने बुधवारी या बद्दल अधिकृत आदेश जारी केला. या आदेशातंर्गत 18 ते 52 वयोगटातील सर्व नोकरदार महिलांना दर महिन्यात एक दिवस मासिक पाळीसाठी सुट्टी दिली जाईल. हा आदेश कायमस्वरुपी आणि कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या महिलांना लागू होईल. कर्नाटक सरकारने या संदर्भात 12 नोव्हेंबरला एक अधिकृत आदेश जारी केला होता. 18 ते 52 वर्ष वयोगटातील कायमस्वरुपी आणि कॉन्ट्रॅक्टवर असलेल्या महिलांना मासिक पाळीसाठी वर्षातले 12 दिवसांचं लीव पेमेंट केलं जाईल. म्हणजे महिन्यातला एक दिवस. या निर्णयात कुठलीही चालढकल होणार नाही. कोणी नियमाच उल्लंघन केलं. मासिक पाळी दरम्यानच महिलांचं वेतन कापलं तर नियमानुसार कारवाई केली जाईल.

सरकारी आदेशानुसार, दर महिन्यातील एक दिवस मासिक पाळीसाठी सुट्टी घेता येईल. डेक्कन हेराल्डच्या रिपोर्टनुसार, सरकारी आदेशात कंपन्यांच्या मालकांना निर्देश देण्यात आले आहेत की,फॅक्ट्रीज एक्ट 1948 नुसार, कर्नाटक दुकान वाणिज्यिक प्रतिष्ठान अधिनियम, 1961, बागान श्रमिक अधिनियम, 1951, बीडी सिगार श्रमिक अधिनियम, 1966 आणि मोटर वाहन श्रमिक अधिनियम, 1961 अंतर्गत येणाऱ्या प्रतिष्ठानांना 18 ते 52 वर्ष वयोगटातील सर्व महिला कर्मचाऱ्यांना प्रति वर्ष 12 वेतन सुट्टया देण्यास सांगितलं आहे.

आयटी मध्ये काम करणाऱ्या महिलांच काय?

आयटी कंपन्यात नोकरी करणाऱ्या महिलांना सुद्धा मासिक पाळीची सुट्टी मिळेल. हे धोरण क्राइस्ट (डीम्ड-टू-बी यूनिवर्सिटी) डॉ. सपना एस यांच्या अध्यक्षतेखालील 18 सदस्यीय समितीने तयार केलेलं. समितीने आधी वर्षाला सहा मासिक पाळीच्या सुट्टया देण्याचा प्रस्ताव मांडलेला. श्रम विभागाने यात बदल करुन ही संख्या 12 पर्यंत वाढवली. मान्यतेसाठी हा प्रस्ताव सरकारकडे पाठवला.

मेडिकल लेटर दाखवण्याची आवश्यकता नसेल

सरकारी आदेशानुसार, महिला कर्मचाऱ्यांना त्याच महिन्यात मासिक पाळी सुट्टीचा वापर करावा लागेल. याचा वापर केला नाही, तर पुढच्या महिन्यात किंवा नंतर एकत्रित सुट्टी मिळणार नाही. सुट्टी घेताना महिलांना मेडिकल लेटर दाखवण्याची आवश्यकता नसेल असं आदेशात स्पष्टपणे म्हटलं आहे. महिला तोंडी कंपनीच्या एचआर विभागाला कळवून सुट्टी घेऊ शकतात.

Follow Us