AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या राज्यात महिलांना एक दिवसाची ‘पीरियड्स लिव्ह’, स्वातंत्र्य दिनाची महिलांना भेट

हे एक महत्त्वपूर्ण प्रगतीशील पाऊल आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी लैंगिक-समानता येईल, महिलांना कठीण काळात आवश्यक असलेला आधार आणि आदर या धोरणामुळे मिळेल असे महिला हक्क कार्यकर्त्या अनुराधा बिस्वाल यांनी म्हटले आहे.

या राज्यात महिलांना एक दिवसाची 'पीरियड्स लिव्ह', स्वातंत्र्य दिनाची महिलांना भेट
Menstrual LeaveImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Aug 15, 2024 | 7:09 PM
Share

ओडिशा सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सरकारी आणि प्रायव्हेट, दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व महिलांना कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसाची ‘पीरियड्स लिव्ह’ लागू केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर महिलांना आनंद देणारा हा निर्णय घेण्यात आला आहे. या सुट्टीचा उद्देश्य मासिक पाळी ( Menstrual Leave) दरम्यान महिलांना होणाऱ्या शारीरिक मानसिक आव्हानांना लक्षात घेऊन घेण्यात आला असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री परिदा यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री परिदा यांनी सांगितले की आज आपण स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करीत आहोत. आमचे सरकार महिलांसाठी एक असे पाऊल उचलत आहे ज्यामुळे त्यांना कामाच्या ठिकाणी सहानुभूती आणि पाठिंबा मिळेल. सरकारचे हे धोरण महिलांच्या आरोग्य आणि कल्याणाला प्राधान्य देण्यासाठी एक महत्वाचा निर्णय आहे.  त्यापुढे म्हणाल्या की महिला कर्मचारी आपल्या पीरियड्सच्या एक दिवस आधी किंवा दुसऱ्या दिवशी त्यांच्या आवश्यकतेनूसार एक दिवसांची सुटी घेऊ शकतात असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

केव्हापासून निर्णय लागू

हा निर्णय तातडीने लागू झाला असल्याचे उपमुख्यमंत्री परिदा यांनी सांगितले. हा एक चांगला पायंडा पाडणारा निर्णय आहे. ओडिशा हे राज्य मासिक धर्म समानता Menstrual Equity च्या क्षेत्रात देशाचे नेतृत्व करणारे ठरणार आहे. या मोहीमेचा उद्देश्य महिलासाठी एक कलेक्टीव आणि कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण करण्याचा आहे. महिला आत्मसन्मानाच्या  दिशेने एक मोठे पाऊल ठरणार असून  सरकारचा हा  निर्णय जगाला देखील प्रेरणा देणारा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. ओदिशा सरकारच्या या निर्णयाचे महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि आरोग्य तज्ज्ञांकडून स्वागत करण्यात आले आहे.

Follow Us
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?