Video : भाजपाच्या महिला कार्यकर्त्याला नग्न करून मारहाण? पोलिसांनी थेट…व्हिडीओमुळे खळबळ!

हुबळीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तेथे भाजपाच्या एका महिला कार्यकर्त्याला पोलिसांनी नग्न करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला जातोय.

Video : भाजपाच्या महिला कार्यकर्त्याला नग्न करून मारहाण? पोलिसांनी थेट...व्हिडीओमुळे खळबळ!
bjp
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 07, 2026 | 7:59 PM

BJP Activist : राज्यात महानगरपालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. प्रचार शिगेला पोहोचला आहे. सभा, कॉर्नर बैठका, गाठीभेटी वाढल्या आहेत. काहीही झालं तरी त्या त्या शहरातील पालिकांवर सत्ता मिळवायचीच असा निश्चय पक्षांनी केला आहे. त्यामुळेच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. असे असतानाच आता सध्या कर्नाटकात असलेल्या परंतु मराठी बहुल असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील हुबळी येथील धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पोलिसांनी महिला भाजपा कार्यकर्त्याला नग्न करून मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. विशेष म्हणजे काँग्रेसच्या नगरसेवकाने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर आता खळबळ उडाली आहे.

नेमके प्रकरण काय? काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार हुबळीमध्ये पोलिसांनी भाजपाच्या महिला कार्यकर्त्याला नग्न करून मारहाण केली आहे. तसा आरोप केला जातोय. या काँग्रेस नगरसेवकाने एक तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी ही मारहाण केल्याचा दावा केला जातोय. मारहाण झालेल्या महिला कार्यकर्त्याचे नाव सुजाता हांडी उर्फ विजयालक्ष्मी असे आहे. हुबळी येथील केशवापूर येथे एक आंदोलन चालू होते. या आंदोलनादरम्यान पोलीस आले आणि सुजाता हांडी यांना जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या नगरसेविका सुवर्णा कल्लकुंटला यांच्या तक्रारीनंतरच ही कारवाई करण्यात आली, असा आरोप सुजाता हांडी यांनी केला आहे.

पोलिसांनी काय स्पष्टीकरण दिले?

भाजपाच्या महिला कार्यकर्त्याने केलेल्या या आरोपानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे कर्नाटकातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. हुबळी-धारवाडच्या पोलीस आयुक्तांनी समोर येत या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. सुजाता हांडी यांना अटक करताना कोणतेही बेकायदेशीर कृत्य केलेले नाही. पोलीस जेव्हा अटकेची कारवाई करत होते, तेव्हा महिलेने स्वत:हून कपडे काढले. पोलिसांच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी महिलेने असे केले होते, असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, आता या प्रकरणात नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.