महिला खासदाराशी निकाह कबूल, नमाजलाही ओके, ओवैसी दाजी बोलणार का? करणी सेनेचा नेता बरळला!

सध्या सोशल मीडियावर करणी सेनेच्या नेत्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो महिला खासदाराविषयी आक्षेपार्ह बोलताना दिसत आहे.

महिला खासदाराशी निकाह कबूल, नमाजलाही ओके, ओवैसी दाजी बोलणार का? करणी सेनेचा नेता बरळला!
Ikra Hasan
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 21, 2025 | 5:42 PM

समाजवादी पक्षाच्या खासदार इकरा हसन यांच्याविरुद्ध करणी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ठाकूर योगेंद्र राणा यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या सोशल मीडिया व्हिडीओमुळे मुस्लिम समुदायात संताप पसरला आहे. तसेच मुरादाबाद येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठी खळबळ उडवली आहे.

पोलिसात तक्रार दाखल

मुरादाबादच्या माझोला येथील रहिवासी सुनीता यांनी कटघर पोलिस ठाण्यात रविवारी ठाकूर योगेंद्र राणा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यांनी खासदार इकरा हसन यांच्याविरुद्ध वापरलेली भाषा अश्लील, वैयक्तिक आणि लज्जास्पद असल्याचे सांगितले. सुनीता यांनी या वर्तनाला नैतिकदृष्ट्या निंदनीय म्हटले आणि अशा कृत्यांमुळे महिला लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा मलीन केली जात असल्याचे नमूद केले.

वाचा: एका हातात साप, दुसऱ्या हातात कापड; अभिनेत्याने सोसायटीमध्ये शिरलेला साप पडकला

काय आहे प्रकरण?

ठाकूर योगेंद्र राणा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी इकरा हसन यांच्याशी लग्न करण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी म्हटले की, ते इकरा हसन यांच्यासोबतचा निकाह कुबूल करतात आणि त्या माझ्या घरी नमाजचे पढण करु शकतात, यावर त्यांना आक्षेप नाही. त्यांनी AIMIMचे नेते असदुद्दीन आणि अकबरुद्दीन ओवैसी यांनी त्यांना “दाजी” म्हणावे, अशी अट ठेवली. हिंदू-मुस्लिम बंधुत्वासाठी तिलक लावण्याची तयारीही दर्शवली.

सामाजिक आणि राजकीय संताप

या व्हिडीओनंतर मुस्लिम समुदायातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. समाजवादी पक्षाचे खासदार एसटी हसन यांनी हे केवळ इकरा हसन यांच्याच नव्हे, तर संपूर्ण मुस्लिम समुदाय आणि संसदेच्या प्रतिष्ठेचा अपमान असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावरही या वक्तव्यावर जोरदार टीका होत आहे. अनेकांनी याला असंवेदनशील आणि आक्षेपार्ह ठरवले आहे.

पोलिस कारवाई आणि राणा फरार

सुनीता यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ठाकूर योगेंद्र राणा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी राणा यांचे सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक करण्याची आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशी भाषा वापरण्याचे धाडस करू नये. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर राणा यांनी मोबाइल बंद करून पळ काढला आहे आणि ते सध्या फरार आहेत.