Kashi Vishwanath Corridor: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गंगा स्नान, पुष्प आणि जल अर्पण, पवित्र गंगाजलही घेऊन जाणार

| Updated on: Dec 13, 2021 | 12:45 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालभैरव मंदिरात पूजा केल्यानंतर गंगा नदीत डुबकी घेत गंगा स्नान केलं. यावेळी मोदींनी पुष्ण आणि जल अर्पण करत मनोभावे सूर्य देवाची पूजा केली. तसेच पवित्र गंगेतील जल सोबतही घेतलं.

Kashi Vishwanath Corridor: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गंगा स्नान, पुष्प आणि जल अर्पण, पवित्र गंगाजलही घेऊन जाणार
Follow us on

वाराणासी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालभैरव मंदिरात पूजा केल्यानंतर गंगा नदीत डुबकी घेत गंगा स्नान केलं. यावेळी मोदींनी पुष्ण आणि जल अर्पण करत मनोभावे सूर्य देवाची पूजा केली. तसेच पवित्र गंगेतील जल सोबतही घेतलं.

pm modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या वाराणासी दौऱ्यावर आले आहेत. वाराणासी एअरपोर्टवर येताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदिबेन पटेल यांनी त्यांचं स्वागत केलं. वाराणासीत आल्यावर त्यांनी आधी नागरिकांना हात उंचावून नमस्कार केला. त्यानंतर मोदी थेट कालभैरव मंदिरात पोहोचले. काशीच्या कोतवाल कालभैरव मंदिरात येऊन त्यांनी पूजा अर्चना केली. या मंदिरात मोदी तब्बल 20 मिनिटे होते. यावेळी त्यांनी मंदिराच्या पुजाऱ्याशीही चर्चा केली.

PM Narendra Modi

त्यानंतर मोदी आणि योगी आदित्यनाथ बोटीने ललित घाटावर पोहोचले. तिथून ते काशी विश्वनाथ मंदिरला जाणार आहे. मोदी बोटीतून जात असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या व्यतिरिक्त त्यांच्यासोबत कुणीच नव्हते. सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यातच ते घटनास्थळी पोहोचले.

pm modi

ललित घाटावर आल्यानंतर मोदींनी गंगा नदीत डुबकी घेतली. त्यांनी जल आणि पूष्प अर्पण केलं. सूर्यदेवाला अर्ध्य देत मनोभावे पूजा केली. गंगा स्नान करण्यासाठी मोदी नदीच्या मधोमध गेले होते. तब्बल 15 ते 20 मिनिटे त्यांनी मनोभावे पूजा केली. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील भक्तीभाव दिसून येत होता. मोदींचे गंगा स्नान आणि पूजा सुरू असताना ललिता घाटावर मोठी गर्दी उसळली होती. अनेकांनी मोदींची गंगा पूजा करतानाचे फोटो कॅमेऱ्यात कैद केले.

pm modi

काशीत आल्यानंतर मोदींनी एक ट्विट केलं. काशीला आल्यावर सद्गदीत झालो. काही वेळानंतर आपण सर्व काशी विश्वनाथ प्रकल्पाच्या लोकार्पणाचे साक्षीदार होणार आहोत. या आधी मी काशीच्या कोतवाल काल भैरवाचे दर्शन घेतले, असं ट्विट मोदींनी केलं आहे.

pm modi

संबंधित बातम्या:

Narendra Modi in Varanasi LIVE : कालभैरव मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरती

Kashi Vishwanath Corridor: काशीत आज दिवाळी, मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथ धामचं लोकार्पण, काय काय तयारी?

Varanasi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस काशी दौऱ्यावर, काशी विश्वनाथ कॉरीडॉरचं लोकार्पण, वाचा संपूर्ण दौरा