Narendra Modi in Varanasi LIVE : भाजपशासित मुख्यमंत्र्यांसोबत नरेंद्र मोदींची बैठक

| Updated on: Dec 15, 2021 | 6:13 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाराणसी दौऱ्यचा आज दुसरा दिवस आहे. दुपारी 3:30 वाजता, पंतप्रधान वाराणसीतील स्वरवेद महामंदिर येथे सदगुरु सदाफलदेव विहंगम योग संस्थानच्या 98 व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील.

Narendra Modi in Varanasi LIVE : भाजपशासित मुख्यमंत्र्यांसोबत नरेंद्र मोदींची बैठक
देशविदेशातील भाविकांची सोय व्हावी आणि पर्यटनाचं आकर्षणाचं केंद्र बनावं म्हणून काशी विश्वनाथ धामचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मोदींच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडत असल्याने या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाराणसी दौऱ्यचा आज दुसरा दिवस आहे. दुपारी 3:30 वाजता, पंतप्रधान वाराणसीतील स्वरवेद महामंदिर येथे सदगुरु सदाफलदेव विहंगम योग संस्थानच्या 98 व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील. दोन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान आसाम, अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि बिहार आणि नागालँडच्या उपमुख्यमंत्र्यांचा सहभाग असलेल्या परिषदेत सहभागी होणार आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
• 14 Dec 2021 07:35 AM (IST)

भाजपशासित मुख्यमंत्र्यांसोबत नरेंद्र मोदींची बैठक

भाजपशासित मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक

भाजपशासित राज्यांचे उपमुख्यमंत्रीही बैठकीत सहभागी होणार

गुड गव्हर्नन्स बाबत मोदी घेणार मुख्यमंत्र्यांची बैठक

पंतप्रधान मोदी वाराणसी मध्ये घेणार बैठक

• 13 Dec 2021 08:36 PM (IST)

वाराणसी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी वाराणसीच्या गंगा घाटावर एका क्रूझवर लेझर लाईट शो पाहिला

शहरात आज शिव दीपोत्सव साजरा होत आहे

• 13 Dec 2021 08:33 PM (IST)

वाराणसी

पंतप्रधान मोदींनी सोमवारी क्रूझवर 'गंगा आरती' पाहिली. यावेळी दशाश्वमेध घाटासह 84 घाट दिव्यांनी उजळून निघाले.

• 13 Dec 2021 02:38 PM (IST)

माझ्यासाठी जनता जनार्दन हे भगवंताचे रूप आहे, प्रत्येक भारतीय हा भगवंताचा अंश आहे, म्हणून मला काहीतरी मागायचे आहे

• 13 Dec 2021 02:37 PM (IST)

आज आपल्याला तिसरा संकल्प करायचा आहे, तो म्हणजे स्वावलंबी भारतासाठी आपले प्रयत्न वाढवणे

• 13 Dec 2021 02:31 PM (IST)

आजचा भारत आपला गमावलेला वारसा पुन्हा मिळवत आहे

• 13 Dec 2021 02:30 PM (IST)

प्रत्येक भारतीयाच्या हातात ती शक्ती असते, जी अकल्पनीय सत्यात उतरवते

• 13 Dec 2021 02:29 PM (IST)

काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन भारताला निर्णायक दिशा देईल, उज्वल भविष्याकडे नेईल

• 13 Dec 2021 02:24 PM (IST)

सारनाथ येथे भगवान बुद्धांचा साक्षात्कार जगाला झाला

• 13 Dec 2021 02:23 PM (IST)

येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरण पडले होते

• 13 Dec 2021 02:21 PM (IST)

नरेंद्र मोदी

काशी ही चार जैन तीर्थंकरांची भूमी आहे, अहिंसा आणि तपस्याचे प्रतीक आहे.

राजा हरिश्चंद्राच्या सचोटीपासून वल्लभाचार्य, रामानंद जी यांच्या ज्ञानापर्यंत

चैतन्य महाप्रभू, समर्थ गुरु रामदास ते स्वामी विवेकानंद, मदन मोहन मालवीय

काशीच्या पवित्र भूमीशी किती ऋषी आणि आचार्यांचा संबंध आहे?

• 13 Dec 2021 02:13 PM (IST)

काशी शब्दांचा विषय नाही तर संवेदनांची सृष्टी : नरेंद्र मोदी

काशी शब्दांचा विषय नाही तर संवेदनांची सृष्टी आहे

• 13 Dec 2021 02:07 PM (IST)

काशी विश्वनाथ मंदिर परिसरात आता 75 हजार भाविक येऊ शकतील

• 13 Dec 2021 02:07 PM (IST)

काशीला कोण रोखू शकतं : नरेंद्र मोदी

काशीला कोण रोखू शकतं : नरेंद्र मोदी

काशी तो काशी है! काशी तो अविनाशी है।

काशी में एक ही सरकार है, जिनके हाथों में डमरू है, उनकी सरकार है।

जहां गंगा अपनी धारा बदलकर बहती हों, उस काशी को भला कौन रोक सकता है? - PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 13, 2021

• 13 Dec 2021 01:57 PM (IST)

आपण काशीमध्ये प्रवेश केल्यावर सर्व बंधनातून मुक्त होतो : नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित असलेल्या लोकांचे आभार मानत भाषणाची सुरुवात केली.  आपल्या पुराणात सांगितलं गेलं की आहे की एखादी व्यक्ती काशीत प्रवेश करतो त्यावेळी तो बंधनातून मुक्त होतो. आज काशीमध्ये अनोखी आस्था पाहायला मिळत आहे.

• 13 Dec 2021 01:21 PM (IST)

नरेंद्र मोदींकडून काशी विश्वनाथ मंदिरात सफाई कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी

नरेंद्र मोदींनी काशी विश्वनाथ मंदिरात सफाई कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी केली आहे. नरेंद्र मोदी सध्या वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत.

• 13 Dec 2021 12:15 PM (IST)

गंगा नदीत किनाऱ्यावरील ललिता घाटावर नरेंद्र मोदींची डुबकी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशी मधील काल भैरव मंदिरात आरती केल्यानंतर गंगा नदीत पुजा केली. गंगा नदीतील ललिता घाटावर नरेंद्र मोदी यांनी प्रार्थना केली. यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

• 13 Dec 2021 12:04 PM (IST)

PM Modi at Varanasi | कालभैरव मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आरती संपन्न

PM Modi at Varanasi | कालभैरव मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आरती संपन्न

• 13 Dec 2021 11:52 AM (IST)

भाजप नेत्यांकडून मुंबईतील बाबूलनाथ या पिराचिन मंदीरातही होणार महापूजा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी इथे श्री काशी विश्वनाथ धामचे करणार उदघाटन…

मुंबईतील बाबूलनाथ या पिराचिन मंदीरातही होणार महापूजा…

- देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या ऊपस्थितीत होणार पुजा…

- मंदीर परिसर करण्यात आला स्वच्छ, निर्मळ आणि सुंदर…

- रांगोळी आणि भगव्या पताक्यांनी सजलं बाबूलनाथांचं मंदीर…

• 13 Dec 2021 11:51 AM (IST)

वाराणसी येथील काशी विश्वेश्वर कॉरिडॉर कार्यक्रमाचे भिवंडीत प्रक्षेपण

वाराणसी येथील काशी विश्वेश्वर कॉरिडॉर कार्यक्रमाचे भिवंडीत शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या कडून 5 ठिकाणी थेट प्रक्षेपणाची सोय. शहरातील विविध मंदिर परीसरात एलईडी स्क्रीन वर नागरीकांना सोहळा पाहता येणार आहे

• 13 Dec 2021 11:44 AM (IST)

PM Modi Kashi | पंतप्रधान मोदींच्या हस्ते कालभैरवाची आरती, वाराणसीहून थेट LIVE

PM Modi Kashi | पंतप्रधान मोदींच्या हस्ते कालभैरवाची आरती, वाराणसीहून थेट LIVE

• 13 Dec 2021 11:11 AM (IST)

नरेंद्र मोदी काल भैरव मंदिरात एक तास अगोदर पोहोचले

काशी विश्वनाथ धामच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणानिमित्त नरेंद्र मोदी काशी वाराणसीमध्ये पोहोचले आहेत. काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या लोकार्पणानिमित्त काल भैरव मंदिरात आरती करण्यात आली. काल भैरव मंदिराकडे जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे.

• 13 Dec 2021 11:05 AM (IST)

कालभैरव मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरती

कालभैरव मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरती करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर पुजारी यावेळी उपस्थित आहेत.

• 13 Dec 2021 10:45 AM (IST)

नरेंद्र मोदी 12 ते 1 दरम्यानं काल भैरव आणि काशी विश्वनाथ मंदिरात आरती करणार

• 13 Dec 2021 10:43 AM (IST)

काशी विश्वनाथ धाम प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात, 23 इमारतींचे उद्घाटन

काशी विश्वनाथ धाम प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात, 23 इमारतींचे उद्घाटन केले जाणार आहे. या अंतर्गत, श्री काशी विश्वनाथ मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांना विविध सुविधा पुरवल्या जाणार आहेत. यात, यात्री सुविधा केंद्र, पर्यटक सुविधा केंद्र, वैदीक केंद्र, मुमुक्षू भवन, भोगशाला, शहर वस्तूसंग्रहालय, पर्यटक गॅलरी, फूड कोर्ट अशा सुविधांचा समावेश आहे.

• 13 Dec 2021 08:58 AM (IST)

काशी विश्वनाथ धामच्या प्रकल्पावर नरेंद्र मोदींचं सुरुवातीपासून लक्ष

प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर पंतप्रधान स्वतः देखरेख ठेवून होते, या प्रकल्पाविषयी, नियमितपणे माहिती, आढावा घेणे आणि देखरेखीचे काम त्यांनी वेळोवेळी केले. तसेच, कामाचा दर्जा वाढवण्यासाठी, प्रकल्पातील सुविधा सर्व भाविकांसाठी-अगदी दिव्यांगांसाठीही अधिकाधिक सहज साध्य होण्यासाठीच्या सूचना आणि सल्लेही त्यांनी वेळोवेळी दिले. या प्रकल्पाची संरचना अशा तऱ्हेची करण्यात आली आहे, जेणेकरुन, वृद्ध लोक आणि दिव्यांगांना इथे जाणे सुलभ होईल. त्यात रेंप, एस्केलेटर्स आणि इतर आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात, 23 इमारतींचे उद्घाटन केले जाणार आहे. या अंतर्गत, श्री काशी विश्वनाथ मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांना विविध सुविधा पुरवल्या जाणार आहेत. यात, यात्री सुविधा केंद्र, पर्यटक सुविधा केंद्र, वैदीक केंद्र, मुमुक्षू भवन, भोगशाला, शहर वस्तूसंग्रहालय, पर्यटक गॅलरी, फूड कोर्ट अशा सुविधांचा समावेश आहे.

• 13 Dec 2021 08:25 AM (IST)

काशी विश्वनाथ धामची नेमकी संकल्पना नेमकी काय?

बाबा विश्वनाथाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांसाठी विविध सुविधा उभरल्या जाव्यात, अशी पंतप्रधान मोदी यांची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. इथे येणाऱ्या भाविकांना कायम, अव्यवस्था, गर्दीचे छोटे रस्ते, आणि गंगेत स्नान करण्याच्या जागांवर अस्वछता याचा त्रास सहन करावा लागतो. गंगाजल घेणे आणि मंदिरात ते अर्पण करण्याच्या प्रथेच्या पालनातही त्यांना त्रास होतो. त्यामुळे, त्यांना विविध सुविधा देण्यासाठी, श्री काशी विश्वनाथ धाम, या भव्य प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली. श्री काशी विश्वनाथ मंदिराला गंगा नदीशी जोडणारे सगळे मार्ग सहजतेने जोडण्याचे काम या प्रकल्पाअंतर्गत करण्यात आले आहे. या पवित्र प्रयत्नाची सुरुवात करण्यासाठी 8 मार्च 2019 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या जागेवर भूमीपूजन करण्यात आले होते.

• 13 Dec 2021 07:43 AM (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दोन दिवसांचा दौरा

पंतप्रधान 13 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता कालभैरव मंदिराला भेट देतील आणि 13 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता रो-रो जहाजातून गंगा आरतीचे साक्षीदार होतील. 14 डिसेंबर रोजी, दुपारी 3:30 वाजता, पंतप्रधान वाराणसीतील स्वरवेद महामंदिर येथे सदगुरु सदाफलदेव विहंगम योग संस्थानच्या 98 व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील. दोन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान आसाम, अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि बिहार आणि नागालँडच्या उपमुख्यमंत्र्यांचा सहभाग असलेल्या परिषदेत सहभागी होणार आहेत.

• 13 Dec 2021 07:36 AM (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 वाजताच्या सुमारास काशी विश्वनाथ मंदिरात पूजा करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारी रोजी दुपारी एक वाजताच्या सुमाराला, पंतप्रधान श्री काशी विश्वनाथाच्या मंदिरात जाऊन पूजा-अर्चा करतील आणि त्यानंतर ते काशी विश्वनाथ धाम च्या पहिल्या टप्प्यातील इमारतींचे उद्घाटन करतील. सुमारे 339 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

• 13 Dec 2021 07:03 AM (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 आणि 14 डिसेंबर रोजी वाराणसीत असतील. दोन दिवसांचा हा दौरा 30 तासांचा असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष विमानानं बाबतपूर विमानतळावर पोहोचतील. तिथून पुढेल संपूर्णानंद मैदानापर्यंत हेलिकॉप्टरनं येणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि इतर प्रतिनिधी त्यांचं एअरपोर्टवर स्वागत करतील.

Published On - Dec 13,2021 6:56 AM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.