1,44,50,000 रुपयांच्या करकरीत नोटा… ड्रायव्हरच्या सीट खाली होता सीक्रेट बॉक्स, झडती घेताच…

केरळ-कर्नाटक सीमेवर पोलिसांनी एका कारमधून ₹1.44 कोटींची बेकायदेशीर रोख रक्कम जप्त केली. ड्रायव्हरच्या सीटखालील गुप्त बॉक्समध्ये ही रक्कम लपवलेली होती. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, पैशांचा स्त्रोत आणि त्यांचे गंतव्यस्थान याचा तपास सुरू आहे.

1,44,50,000 रुपयांच्या करकरीत नोटा... ड्रायव्हरच्या सीट खाली होता सीक्रेट बॉक्स, झडती घेताच...
Cash Seizure
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 02, 2026 | 5:54 PM

केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एखाद्या फिल्मी कहाणीसारखीच ही घटना आहे. एका कारच्या सीटखाली पोलिसांना दोन चार हजार नव्हे तर करोडो रुपये सापडले आहेत. ड्रायव्हरच्या सीटच्या खाली एक सीक्रेट बॉक्स ठेवलेला होता. या बॉक्समध्ये पोलिसांना जवळजवळ दीड कोटीच्या करकरीत नोटा सापडल्या आहेत. केरळ-कर्नाटक बॉर्डवर वायनाडजवळ ही एवढी मोठी रक्कम पोलिसांनी पकडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारच्या ड्रायव्हरच्या सीट खाली एक सीक्रेट बॉक्स तयार करण्यात आलेलं होतं. त्यात 1.44 कोटी रुपयांची कॅश लपवून ठेवली होती. ही कारवाई थोलपेट्टी परिसरात करण्यात आली. थिरुनेल्ली पोलीस आणि जिल्ह्याच्या स्पेशल अँटी ड्रग टीमच्या जवानांनी कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची चेकिंग सुरू केली होती. या दरम्यान एक कार थांबवून कसून तपास करण्यात आला. कारची अत्यंत बारकाईने तपासणी करण्यात आली. त्यावेळी ड्रायव्हरच्या सीटखाली एक गुप्तपणे तयार करण्यात आलेली जागा सापडली. त्यात एक बॉक्स ठेवला होता. त्यामध्ये नोटांचे बंडल लपवून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी एकूण 1,44,50,000 रुपये जप्त केले. गाडीतून त्यावेळी तीन लोक प्रवास करत होते. या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

बॉक्समध्ये नोटाच नोटा

पोलिसांनी गाडीतील तिन्ही लोकांची ओळख पटवली आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी प्रभू राज हा कोझिकोड जिल्ह्यातील वडकारा परिसरातील नदक्कावू स्ट्रीय येथील राहणारा आहे. तर स्वप्निल हा पन्नूरचा रहिवाशी आहे. राहुल नावाचा आरोपी महाराष्ट्रातील असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या तिघांकडे एवढी मोठी रक्कम कुठून आली? त्यांना कुणी ही रक्कम दिली? याचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच हे पैसे कुठे घेऊन जात होते आणि कुणाला देणार होते, याचीही माहिती पोलीस घेत आहेत.

पोलिसांची कारवाई

पोलसी आणि जिल्ह्याच्या एंटी ड्रग्स टीमने ही संयुक्त कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईने थोलपेट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेऊन जात असल्याचं उघड झालं आहे. थोलपेट्टी हा कर्नाटकातून केरळमध्ये जाण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. कारमध्ये बदल करून गुप्त पद्धतीने त्यात नोटा लपवल्या जायच्या. आणि हे पैसे इच्छित स्थळी पोहोचवले जायचे हे आता यातून स्पष्ट झालं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us