कुलगुरुंनी ‘या’तारखेपर्यंत राजीनामा द्यायचाच, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यावरही निशाणा साधला…

राज्यपाल भवनकडून रविवारी यासंदर्भात एक ट्विटही करण्यात आले आहे. त्यामध्ये 9 कुलगुरुंना राजीनामा देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

कुलगुरुंनी यातारखेपर्यंत राजीनामा द्यायचाच, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यावरही निशाणा साधला...
| Updated on: Oct 24, 2022 | 9:06 PM

तिरुअनंतपुरमः केरळमधील राज्यपाल (Governor of Kerala) आणि 9 विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या राजीनाम्याचा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. त्यामुळे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) यांनी सोमवारी सकाळपर्यंत राजीनामा देण्यास नकार देणाऱ्या 9 विद्यापीठांच्या कुलगुरूंना नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचा खुलासा खुद्द राज्यपालांनीच केला आहे. जे राज्य विद्यापीठांचे कुलगुरू (University Vice-Chancellor) आहेत, त्या सर्व कुलगुरूंनी केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या संदर्भात उच्च न्यायालयात स्वतंत्र बैठक घेण्याचीही सध्या जोरदार चर्चा होती.

राज्यपाल भवनकडून रविवारी यासंदर्भात एक ट्विटही करण्यात आले आहे. त्यामध्ये 9 कुलगुरुंना राजीनामा देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

ज्यानी राजीनामा देण्यास नकार दिला आहे त्यांना राज्यपालांनी रीतसर नोटीस बजावून सांगण्यात आले आहे. त्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, यूजीसी नियमनातील तरतुदींच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या ‘सर्च कमिटी’च्या शिफारशीनुसार कुलगुरू म्हणून कोणतीही नियुक्ती अवैध ठरवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या नोटिस देण्यात आल्या आहेत.

कुलगुरूंना राजीनामा देण्याच्या प्रकरणावरुन कारणे दाखवा नोटीसच्या तपशीलाबाबतही सवाल करण्यात आला. त्यावेळी राज्यपाल म्हणाले की, आता कुलगुरूंना उत्तर देण्यासाठी 3 नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील निर्णय काय घेतला जातो याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

या राजीनाम्याबद्दल केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मात्र राज्यपालांवर जोरदार टीका केली आहे. राज्यपालांवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या आपल्यावरील आरोपांना उत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत राज्यपाल यांनी त्यांच्यावरही टीका केली आहे.

याबाबत म्हणाले की, ‘मी फक्त एक चांगला मार्ग सुचवला आहे, त्यामुळे अजूनतरी मी त्यांना बडतर्फ केले नाही.