AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऋषी सुनक यांच्या विजयाचे फटाके, पाकिस्तानतही फुटले…

ऋषी यांचा जन्म 1980 मध्ये साउथम्प्टनमध्ये येथे झाला आहे. पाकिस्तानमध्ये सुनक यांच्याबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितले गेले नसले तरी सोशल मीडियावर मात्र काही लोकांनी अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे.

ऋषी सुनक यांच्या विजयाचे फटाके, पाकिस्तानतही फुटले...
| Updated on: Oct 24, 2022 | 7:58 PM
Share

नवी दिल्लीः भारतीय वंशाचे ऋषी सुनक (rishi sunak) हे आता ब्रिटनचे पुढील पंतप्रधान असणार आहेत. ऋषी सुनक यांच्या आजी-आजोबांचा जन्म ब्रिटीशकालीन भारतात झाला होता परंतु त्यांचे जन्मस्थान हे सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब (Panjab) प्रांतात असलेल्या गुजरांवाला येथे होते. त्यामुळे नवीन ब्रिटनचे पंतप्रधान असलेले सुनक हे भारतीय आणि पाकिस्तानी (Pakistani) दोन्हीही देशाचं प्रतिनिधित्व करत असल्याचे बोलले जात आहे.

आतापर्यंत, त्यांच्या वंशाविषयी थोडा तपशीलवार सोशल मीडियावरही उपलब्ध झाला आहे. आणि ब्रिटनमधील राजकीय वादात भारतीय आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील नागरिकांनी त्यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे.

क्वीन लायन्स 86 या ट्विटर हँडलने ट्विट केले आहे की, “सनक गुजरांवाला पंजाबी खत्री कुटुंबातील आहे, आणि ते आता पाकिस्तानात असल्याचे सांगितले आहे.

ऋषीचे आजोबा रामदास सुनक यांनी 1935 मध्ये गुजरांवाला नैरोबीमधून लिपिकाची नोकरी केली होती.

कौटुंबिक माहिती देणार्‍या क्वीन लायन्स 86 रामदास यांची पत्नी सुहाग राणी सुनक याही 1937 मध्ये केनियाला जाण्यापूर्वी गुजरानवाला येथून त्यांच्या सासूबरोबरच त्या दिल्लीला गेल्या होत्या.

ऋषी यांचा जन्म 1980 मध्ये साउथम्प्टनमध्ये येथे झाला आहे. पाकिस्तानमध्ये सुनक (42) यांच्याबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितले गेले नसले तरी सोशल मीडियावर मात्र काही लोकांनी अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे.

शफत शहा यांनीही ट्विट करुन म्हटले आहे की, पाकिस्तानने ऋषी सुनकवरही आपला हक्क सांगितला पाहिजे. कारण त्यांचे आजी आजोबा गुजरानवाला येथे राहत होते. त्यानंतर त्यांचे आजी-आजोबा केनिया आणि नंतर यूकेला गेले होते.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.