WhatsApp : व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनसाठी महत्त्वाची बातमी; आक्षेपार्ह मेसेजला अ‍ॅडमिन जबाबदार नाही : केरळ हायकोर्ट

| Updated on: Feb 24, 2022 | 6:12 PM

केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ यांच्या खंडपीठापुढे मार्च 2020 मधील एक प्रकरण सुनावणीसाठी पुढे आले होते. त्या प्रकरणातील व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा आणि पोक्सो कायद्याच्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ग्रुपमधील एका सदस्याने पोस्ट केलेल्या आक्षेपार्ह व्हिडीओसाठी त्या ग्रुपच्या अ‍ॅडमिनला जबाबदार धरण्यात आले होते. त्याविरोधात अ‍ॅडमिनने उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

WhatsApp : व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनसाठी महत्त्वाची बातमी; आक्षेपार्ह मेसेजला अ‍ॅडमिन जबाबदार नाही : केरळ हायकोर्ट
आक्षेपार्ह मेसेजला अ‍ॅडमिन जबाबदार नाही : केरळ हायकोर्ट
Follow us on

तिरुवनंतरपुरम : व्हॉट्स अ‍ॅप (Whats App)वर मोठ्या प्रमाणावर ग्रुप (Group) बनवले जातात. अनेक कौटुंबिक पातळीवरचे किंवा मित्रमंडळीचे ग्रुप तयार केलेले असतात. या ग्रुपवर सुरुवातीला काही कौटुंबिक स्वरुपाचे मेसेज शेअर केले जातात. मात्र कालांतराने यावर वादग्रस्त मेसेजही पाठवले जातात. अशा आक्षेपार्ह मेसेजमुळे कधी कुणाच्या धार्मिक भावना दुखावतात तर कधी अश्लिल स्वरुपाचे मेसेज किंवा व्हिडीओ शेअर केले गेल्यामुळे त्याचा महिलांच्या आणि मुलांच्या भावनांना धक्का बसतो. अशा परिस्थितीत मग त्या ग्रुपमधील वातावरण कलूषित बनते. पुढे त्या मेसेजला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होतो. गु्रपमधील इतर सदस्य याबाबतीत अ‍ॅडमिनकडेच बोट दाखवतात. याच पार्श्वभूमीवर केरळच्या उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमधील वादग्रस्त मेसेज किंवा व्हिडीओसाठी त्या ग्रुपचा अ‍ॅडमिन जबाबदार नसतो, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण केरळ उच्च न्यायालयाने नोंदवत एका प्रकरणातील आरोपी अ‍ॅडमिनला मोठा दिलासा दिला. (Kerala High Court says admin is not responsible for offensive messages on WhatsApp group)

2020 मधील एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने मांडले मत

केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ यांच्या खंडपीठापुढे मार्च 2020 मधील एक प्रकरण सुनावणीसाठी पुढे आले होते. त्या प्रकरणातील व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा आणि पोक्सो कायद्याच्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ग्रुपमधील एका सदस्याने पोस्ट केलेल्या आक्षेपार्ह व्हिडीओसाठी त्या ग्रुपच्या अ‍ॅडमिनला जबाबदार धरण्यात आले होते. त्याविरोधात अ‍ॅडमिनने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्याच्या अपिलावर न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. व्हॉट्स ग्रुपमधील सदस्यांकडून ग्रुपमध्ये कुठले मेसेज वा व्हिडीओ पोस्ट केले जाताहेत, यावर अ‍ॅडमिनचे नियंत्रण असू शकत नाही. अ‍ॅडमिन हा ग्रुपमधील संदेश नियंत्रित किंवा सेन्सॉर करू शकत नाही. ते अ‍ॅडमिनचे काम नाही, असे मत न्यायमूर्ती एडप्पागथ यांनी नोंदवले आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा अ‍ॅडमिन हा ग्रुपमध्ये कोणत्याही सदस्याला अ‍ॅड करू शकतो किंवा कोणत्याही सदस्याला ग्रुपमधून काढू शकतो. इतर सदस्यांपेक्षा अ‍ॅडमिनला हाच एकमेव विशेषाधिकार आहे, असे न्यायमूर्ती एडप्पागथ यांनी यावेळी नमूद केले.

केरळमध्ये नेमके काय प्रकरण घडले होते?

मार्च 2020 मध्ये हे प्रकरण घडले होते. केरळातील ‘फ्रेंड्स’ नावाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. त्या व्हिडिओमध्ये लहान मुले लैंगिक कृत्यांमध्ये सहभागी झाल्याचे दाखवण्यात आले होते. तो ग्रुपही याचिकाकर्त्याने तयार केला होता अर्थात ग्रुपचा तो अ‍ॅडमिन होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 ची विविध कलमे आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम 13, 14 आणि 15 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याविरोधात अ‍ॅडमिनने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. (Kerala High Court says admin is not responsible for offensive messages on WhatsApp group)

इतर बातम्या

Nagpur Crime | आधी मुलावर अत्याचार आता दारूसाठी खंडणी, नागपूर पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या

Kalyan Crime : कल्याणमध्ये 55 किलो गांजा जप्त, तीन तस्कर गजाआड, भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्स्प्रेसमध्ये कारवाई