मुली रेपचा आनंद घेतात… जंतरमंतरवरील आंदोलनावर वादग्रस्त विधान करणारे युट्यूबर आणि राजकीय भाष्यकाराला अटक

विद्यार्थ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या राजकीय भाष्यकाराला अटक करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या विधानाने मोठी खळबळ माजली आहे.

मुली रेपचा आनंद घेतात... जंतरमंतरवरील आंदोलनावर वादग्रस्त विधान करणारे युट्यूबर आणि राजकीय भाष्यकाराला अटक
TG-Mohandas
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 10, 2026 | 11:19 AM

केरळ पोलिसांनी सोमवारी उजव्या विचारसरणीच्या राजकीय भाष्यकाराला टीजी मोहनदास यांना अटक केली आहे. नीट पेपर लीकच्या विरोधात जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मोहनदास यांनी ‘पथरिका’ या यूट्यूब चॅनेलवर २४-२५ जुलैला व्हिडिओ अपलोड केले. या व्हिडिओंचा उद्देश लोकांमध्ये भीती निर्माण करणे आणि अशांतता पसरवणे हा होता. तसेच त्यांनी केलेल विधान हे अतिशय चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

मोहनदास यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी व्हिडिओमध्ये असे म्हटले होते- ‘जंतर-मंतरवरील निषेध आंदोलनाने गँगरेपच्या घटना घडू शकतात, पण त्याची कोणतीही तक्रार होणार नाही कारण आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना रेप आवडतो आणि काही मुली अशा आहेत ज्या रेपचा आनंद घेतात.’ त्यांनी असेही म्हटले होते की, जर ते असते तर जंतर-मंतरवर कर्फ्यू लावला असता आणि आंदोलकांना हटण्याचा आदेश दिला असता. आणि आंदोलकांनी नकार दिला तर ते फायरिंगचा आदेश दिला असता.

यूट्यूब चॅनेलची चौकशी, डिजिटल डिव्हाइस जप्त

तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. मोहनदास यांना रविवारी कोच्ची येथील त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना मध्यरात्री तिरुवनंतपुरम सायबर पोलीस स्टेशनवर आणण्यात आले, जिथे त्यांना अटक करण्यात आली. त्यांना सोमवारी कोर्टात हजर केले जाईल. पोलिसांनी सांगितले की, मोहनदास यांच्या यूट्यूब अकाउंटशी संबंधित माहिती गोळा केली आहे. व्हिडिओ तयार करण्यासाठी आणि तो अपलोड करण्यासाठी वापरलेली डिजिटल उपकरणेही पोलिसांनी जप्त केली आहेत. ती कोर्टात सादर करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली जातील.

पोलिसांनी मोहनदास यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), आयटी कायदा आणि केरळ पोलीस कायद्याच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. चौकशी पुढे गेल्यास मोहनदास यांच्याविरुद्ध आणखी काही कलमे जोडली जाऊ शकतात. यामध्ये जाणूनबुजून अशी परिस्थिती निर्माण करणे ज्यामुळे आंदोलन भडकू शकते, खोटे विधान, अफवा किंवा रिपोर्ट प्रकाशित किंवा प्रसारित करणे आणि कोणत्याही संचार माध्यमाद्वारे व्यक्तीला त्रास देणे यासारख्या आरोपांचा समावेश आहे. पोलिसांनी संबंधित सोशल मीडिया ऑपरेटरांला वादग्रस्त व्हिडिओ काढून टाकण्यास सांगितले आहे.

मोहनदास यांना रविवारी ताब्यात घेताना त्यांच्या कोच्ची येथील घराबाहेर मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तिरुवनंतपुरम सायबर पोलीस स्टेशन आणि संबंधित कोर्टाभोवती गर्दी किंवा निदर्शनांच्या शक्यतेबाबत सतर्कता बाळगली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us