खान सरांनी केले गुपचूप लग्न, कोचिंग क्लासमध्ये म्हणाले, ‘युद्धादरम्यान मी लग्न…’
Khan Sir marriage: वेगळ्या पद्धतीने शिकवण्यासाठी प्रसिद्ध असणारे खान सर यांनी 7 मे रोजी लग्न केले. त्यांनी ए.एस. खान नावाच्या मुलीसोबत लग्न केले. त्यांचे लग्न खासगी ठेवण्यात आले. आता पटणामध्ये लग्नाचे रिसेप्शन देणार आहे.

आपल्या अनोख्या अंदाजात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध शिक्षक आणि यूट्यूबर खान सरांनी गुपचूप लग्न केले आहे. खान सरांनी आपल्या कोचिंगमध्ये शिकवत असताना हे स्पष्टीकरण केले. खान सरांच्या या स्पष्टीकरणांना अनेकांना धक्का बसला आहे. सोशल मीडिवर त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात खान सर मी लग्न केले आहे, आता तुमच्यासाठी मेजवणीची व्यवस्था करणार आहे, असे म्हणताना दिसत आहे.
बिहारमधील पाटणा येथील प्रसिद्ध यूट्यूबर आणि शिक्षक खान सर युवकांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहे. वेगळ्या पद्धतीने शिकवणे आणि सामाजिक विषयांवर रोखठोक बोलण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी लग्नासंदर्भात अधिकृत माहिती दिली नव्हती. परंतु आता कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थ्यांसमोर त्यांनी हे राज उघड केले. खान सरांच्या लग्नाबाबत अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. परंतु, यावेळी खान सरांनी स्वतः त्यांच्या विद्यार्थ्यांना माहिती दिली. एका व्हिडिओमध्ये खान सर म्हणतात की, एक गोष्ट मी तुम्हाला अजून सांगितली नाही. या युद्धादरम्यान मी लग्नही केले आहे. आता आम्ही तुम्हा सर्वांसाठी मेजवानीची व्यवस्था करत आहोत. मी हे तुम्हाला सर्वात आधी सांगितले आहे. कारण माझे अस्तित्व तुमच्यामुळेच आहे… आपण २ जून रोजी मेजवानीचा विचार करत आहोत.
खान सर यांनी 7 मे रोजी ए.एस. खान नावाच्या मुलीसोबत लग्न केले. ती मुलगीही बिहारमधीलच आहे. हे लग्न खासगी ठेवण्यात आले. आता खान सर पाटणामध्ये रिसेप्शन देणार आहे. त्यात जवळच्या लोकांना आमंत्रित करणार आहे.
कोण आहे खान सर?
खान सर एक शिक्षक आणि YouTube कंटेंट क्रिएटर आहे. त्यांचे नाव फैजल खान आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोचिंग ते देतात. त्यांचे यूट्यूबवरील चॅनल ‘खान जीएस रिसर्च सेंटर’ चे 24 मिलियन सब्सक्राइबर आहे. या चॅनलवर अनेक व्हिडिओ आहे. त्यात करंट अफेयर्स, राजकारण, गणित या विषयांचा समावेश आहे. बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी नुकतेच त्यांचा चँपियंस ऑफ चेंज बिहार पुरस्कार देऊन गौरव केला होता.
