AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्योती मल्होत्राचा नवा खळबळजनक व्हिडीओ, 6 बंदुकधारी अन्…धक्कादायक माहिती समोर!

ज्योती मल्होत्राचा आणखी एक खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच आश्चर्य व्यक्त करत आहेत.

ज्योती मल्होत्राचा नवा खळबळजनक व्हिडीओ, 6 बंदुकधारी अन्...धक्कादायक माहिती समोर!
JYOTI MALHOTRA
| Updated on: May 26, 2025 | 4:09 PM
Share

मूळची हरियाणाची असलेली यूट्यूबर ज्योती मल्होत्रा सध्या तपास संस्थांच्या ताब्यात आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली तिची कसून चौकशी केली जात आहे. असे असतानाच आता तिच्याबाबत रोजच नवनवे खुलासे होत आहेत. एकीकडे तिची चौकशी केली जात असताना आता तिचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ती तब्बल 6 बंदुकधारी लोकांमध्ये पाकिस्तानात खुलेआम फिरताना दिसत आहे. यामुळेच तिला पाकिस्तानमध्ये एवढी ताकद नेमकी कशी मिळाली? असा सवाल केला जातोय.

ज्योतीच्या आजूबाजूला सहा बंदुकधारी

समोर आलेल्या नव्या व्हिडीओत ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या लाहोरमधील प्रसिद्ध असलेल्या अनारकली बाजारात फिरताना दिसत आहे. याच वेळी तिच्या आजूबाजूला पाच ते सहा बंदुकधारी दिसत आहेत. ती रस्त्यावर फिरत असताना हे बंदुकधारी तिचे संरक्षण करत आहेत. हाच व्हिडीओ पाहून पाकिस्तानमध्ये तिच्याकडे एवढी ताकद नेमकी कुठून आली, असा सवाल उपस्थित केला जातोय. हा प्रश्न स्कॉटलँडचा यूट्यूबर कॅलम मिल याने उपस्तित केला आहे. मिल हादेखील एक यूट्यूबर असून तो आतपर्यंत पाकिस्तानसह इतर काही देश फिरलेला आहे.

ज्योती आणि यूट्यूबरची भेट

कॅलम मिल याने त्याच्या यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. याच व्हिडीओत ज्योती मल्होत्रा आणि तो एकमेकांसमोर आल्याचे दाखवण्यात आले आहे. ज्योतीने त्याच्याशी संवाद केल्याचंही या व्हिडीओत दिसतंय. ज्योतीने मिल याला तू कुठून आलायस असं विचारलंय. तसेच तू याआधी पाकिस्तानात किती वेळा आलायस, असंही तिने विचारलंय. याला उत्तर म्हणून मिल याने मी चार ते पाच वेळा पाकिस्तामध्ये आलेलो आहे, असं सांगितलं. त्यानंतर मी भारतातून आली आहे. कधी वेळ भेटला तर भारतात ये, असं ज्योतीने मिल याला म्हटल्याचं या व्हिडीओत दिसतंय.

यूट्यूबरने व्यक्त केले आश्चर्य

हा संवाद झाल्यानंतर ज्योती मल्होत्रा पुढे निघून गेल्याचं दिसतंय. यावेळी तिच्यासोबत पाच ते सहा शस्त्रधारी असल्याचं दिसतंय. याच वेळी कॅलम याने ज्योती मल्होत्रासोबत एवढे सारे शस्त्रधारी का आहेत? असा प्रश्व विचारला आहे. कॅलम याला ज्योती मल्होत्राला पाहून आश्चर्य वाटलेले आहे. या बंदुकांची गरज काय आहे हे मला समजलेले नाही. तिच्या भोवती एकूण सहा जण बंदुक घेऊन उभे आहेत, असं हा यूट्यूबर म्हणताना दिसतोय.

दरम्यान, ज्याती मल्होत्रा सध्या तपास संस्थांच्या ताब्यात आहे. त्यामुळे भविष्यात तिच्या चौकशीतून नेमके काय-काय खुलासे होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.