Kisan Mahapanchayat : कृषी कायद्यांविरोधात शेतकरी पुन्हा आक्रमक, विविध मागण्यांसाठी 27 सप्टेंबरला भारत बंद, राकेश टिकैत यांची घोषणा

| Updated on: Sep 05, 2021 | 5:16 PM

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी मोर्चाने 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. शेतकरी संघटनांच्या या घोषणेनंतर आता सरकारच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत.

Kisan Mahapanchayat : कृषी कायद्यांविरोधात शेतकरी पुन्हा आक्रमक, विविध मागण्यांसाठी 27 सप्टेंबरला भारत बंद, राकेश टिकैत यांची घोषणा
rakesh-tikait
Follow us on

मुझफ्फनगर : कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेशमध्ये महापंचायतीच्या माध्यमातून कृषी कायदे तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांना घेऊन केंद्र सरकारवर टीका केली. तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली. टिकैत यांच्या या घोषणेनंतर आता केंद्र सरकारच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. (Kisan Panchayat in Muzaffarnagar farmer leader Rakesh Tikait announces Bharat Band on 27 September)

सरकारने जानेवारीपासून संवाद बंद केला

मागील कित्येक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. केंद्राने लागून केलेल्या कृषी कायद्यांना परत घ्यावं अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. या मुद्द्यावर शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र, या चर्चांतून कोणताही ठोस मार्ग निघालेला नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाने जोर पकडला आहे. शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे राकेस टिकैत उत्तर प्रदेशमध्ये महापंचायतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मेळावे भरवत आहेत. तसेच या महापंचायतीमध्ये राकेश टिकैत केंद्र सरकारला लक्ष्य करताना दिसत आहेत.

देशाची संपत्ती विकणाऱ्यांना ओळखलं पाहिजे

उत्तर प्रदेशातमधील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये आज (5 सप्टेंबर) शेतकऱ्यांची महापंचायत भरवण्यात आली आहे. यावेळी बोलताना राकेश टिकैत यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ‘मागील नऊ महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बललेले आहेत. या वर्षाच्या जानेवारीपासून सरकारने आमच्याशी संवाद साधणं बंद केलेलं आहे. देशाची संपत्ती विकणाऱ्यांना आपण ओळखलं पाहिजे. फक्त उत्तर प्रदेशच नव्हे तर उत्तराखंड तसेच संपूर्ण देशात अशा सभा आणि बैठका घेतल्या पाहिजेत. देशात रेल्वे, जहाज आणि विमानतळं विकले जाणार आहेत,’ असे राकेश टिकैत म्हणाले.

27 सप्टेंबर रोजी भारत बंद

महापंचायतीदरम्यान राकेश टिकैत एखादी मोठी घोषणा करतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. टिकैत यांनी कृषी आंदोलनबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी येत्या 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. याआधी किसान मोर्चाने 25 सप्टेंबर रोजी भारत बंद करण्यात येईल असे सांगितले होते.

पिकाला भाव नाही, तर मत नाही

शेतकरी मोर्चाने आयोजित केलेल्या आजच्या महापंच्यातीला हजारो शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली. मुजफ्फरनगर येथील मैदान आज खचाखच भरलेले होते. यावेळी बोलताना राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळाला नाही तर निवडणुकीत मतदानही मिळणार नाही, असे सांगितले. “ही लाढाई ही कृषी कायदे आणि किमान आधारभूत किंमत यासाठी आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नसेल तर शेतकरी मतदान करणार नाहीत. आता मतदानाच्या माध्यमातून आपल्याला घाव घालावा लागेल,” असे टिकैत म्हणाले.

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर शेतकरी आंदोलनाचा परिणाम पडणार ?

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकरी आंदोलन पुन्हा तीव्र झाले आहे. या आंदोलनाची दाहकता आज मुज्जफरनगरमधील महापंचायतीत दिसून आली. त्यातही राकेश टिकैत यांनी 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा केल्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांचे आंदोलन या निवडणुकांमध्ये मोठी भूमिका बजावणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इतर बातम्या :

काँग्रेस करणार जातीनिहाय जनगणनेशी संबंधित मुद्द्यांचा अभ्यास; समिती स्थापन

उत्तर प्रदेशात पुन्हा भाजप, पंजाबमध्ये काँग्रेसला झटका बसण्याची शक्यता; कसा असेल 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कल?

(Kisan Panchayat in Muzaffarnagar farmer leader Rakesh Tikait announces Bharat Band on 27 September)