भीषण अग्नितांडव… 15 तासांनंतरही आग अनियंत्रित… 8 जणांचा मृत्यू तर, 20 बेपत्ता

कारखाना आणि डेकोरेटर गोदामला लागलेल्या आगीमुळे 8 जाणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर 20 जण अद्याप बेपत्ता आहेत... कारखाण्यात असेल्या ज्वलशील पदार्थांमुळे आगीने रौद्र रुप घेतलं... अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

भीषण अग्नितांडव... 15 तासांनंतरही आग अनियंत्रित... 8 जणांचा मृत्यू तर, 20 बेपत्ता
fire at warehouse
| Updated on: Jan 27, 2026 | 9:08 AM

प्रजासत्ताक दिनाची सकाळ अत्यंत भयानक ठरली. कारखाना आणि डेकोरेटर गोदामला लागलेल्या आगीने काही तासांत भीषण रुप घेतलं. गेल्या 15 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण आग नियंत्रणात आली नसल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अग्नीतांडवमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण बेपत्ता आहे… बेपत्ता लोकांचे नातेवाईक आता पोलिसांत तक्रार दाखल करत आहेत. ही भीषण आग कोलकात्याच्या दक्षिणेकडील बाहेरील आनंदपूर येथील एका सुक्या अन्नाच्या गोदामात सोमवारी पहाटे लागल्याची माहिती समोर येत आहे. आग विझवण्यासाठी बारा अग्निशमन दलाच्या गाड्या अथक परिश्रम घेत आहेत. गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थ असल्याने आग वेगाने पसरली.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आग इतकी भीषण होती की आत अडकलेल्या लोकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सापडलेले मृतदेह इतके जळालेले आहेत की त्यांची ओळख पटवणे सध्या अशक्य आहे. ढिगारा साफ करण्यासाठी जेसीबी मशीन आणि रोबोटिक कॅमेरे वापरले जात आहेत.

 

बेपत्ता कर्मचारी पंकज हलदार यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 3:30 वाजता पंकजने फोनवरून सांगितले होतं की, “कारखान्याचा मुख्य दरवाजा बाहेरून बंद आहे आणि आम्ही भिंत तोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत.”

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री मोमो फॅक्टरीसह गोदामात देखील रात्रीच्या शिफ्टचं काम सुरू होतं. सोमवारी मध्यरात्री जवळपास 3 वाजेपर्यंत काम सुरु होता. कारखान्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या पाम तेल आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमुळे आग अधिक भडकली, ज्यामुळे स्फोट झाले आणि आग लागली. अरुंद रस्ते आणि दाट धुरामुळे बचाव कार्यात लक्षणीय अडथळा येत असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

मध्यरात्री लागलेली आगीवर सकाळी 11 वाजेपर्यंत नियंत्रण मिळवण्यात आलं. पण अद्यापही काही ठिकाणी आग लागलेली असून विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री अरुप बिस्वास यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतांच्या कुटुंबियांना सांत्वन दिलं. त्यांनी बचाव कार्याचा आढावा घेतला आणि बेपत्ता झालेल्यांच्या कुटुंबियांशी देखील संवाद साधला.